Asia Cup 2025: सप्टेंबरमध्ये येऊ शकतात भारत-पाकिस्तान आमने सामने

ढाका: ऑपरेशन सिंदूरनंतर आता काही महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने पुन्हा पाहता येण्याची शक्यता आहे. हे सामने आशिया कप २०२५ मध्ये खेळवले जातील. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप २०२५ चे आयोजन भारताकडे सोपवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये युएई मध्ये खेळवली जाईल. गुरुवारी ढाका येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व २५ सदस्य देश सहभागी झाले होते.बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तानने २०२७ पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळण्याचा परस्पर निर्णय घेतला आहे. प्रसारक आणि प्रायोजकांच्या मागणीचा विचार करता, भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवता येईल. यामुळे ३ सामने होतील. प्रथम लीग टप्प्यात, नंतर सुपर सिक्समध्ये किमान एक सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामनादेखील शक्य आहे.

आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व आशिया कप १९८४ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत १६ वेळा आयोजित करण्यात आला आहे. भारताने सर्वाधिक म्हणजे ८ वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय विश्वचषक हा हायब्रिड मॉडेलवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत भारत-पाक महिला संघ लीगमध्ये एकमेकांसमोर येतील. त्याच वेळी, २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात, भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघ लीग दरम्यान भिडतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती. भारताचे सर्व सामने यूएईमध्ये झाले होते, इतकेच नाही तर सेमीफायनल आणि फायनल देखील यूएईमध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद जिंकले.
Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव