'सरकार आमची मुलं परत आणू शकतं का?' पालकांचा आक्रोश

झालावाड, राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातल्या पीपलोद गावात जे घडलं, त्याने संपूर्ण गाव हादरलं आहे. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा छप्पर कोसळला… आणि सात निरागस मुलांचं आयुष्य एका क्षणात संपलं. आणखी तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. त्यातील दहा जण मृत्यूशी झुंज देतायत. पण या साऱ्यात एकच प्रश्न सारं गाव विचारतंय, "आमची गेलेली मुलं परत येणार आहेत का?"


या शाळेची अवस्था कुणालाही माहित नव्हती, असं नाही. वर्षानुवर्षं ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवण्या केल्या. इमारत मोडकळीला आली आहे, दुरुस्ती करा… पण सगळ्यांनी कानाडोळा केला. जी दुरुस्ती झाली, ती केवळ कागदोपत्री. आता तीच इमारत पाचवी ते सातवीच्या वर्गात बसलेल्या मुलांसाठी मृत्यूचा सापळा ठरली.


"माझं पोरगं सकाळी हसतखेळत शाळेत गेलं होतं… दुपारी त्याचं झाकलेलं प्रेत परत आलं… सरकारनं काय केलंय? आता ते मला माझं पोरगं परत देईल का?" – एक आई तळमळून ओरडते. तिचे अश्रू थांबत नाहीत… आणि सारं गाव स्तब्ध झालेलं असतं.



ही दुर्घटना सकाळच्या प्रार्थनेनंतर घडली. मुलं वर्गात गेली आणि काही क्षणांत सातवीच्या वर्गाचा छप्पर अंगावर कोसळला. काही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. बाकी जखमींना गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. प्रशासन आलं, पण उशिरा. ज्या वेळी ते आले, तेव्हा काही नाजूक जीव आधीच निघून गेले होते.


"आता नुकसानभरपाई देणार, थोडंफार पैसा देणार… पण आमची मुलं परत मिळणार का?" – या एका प्रश्नात हजारो आईबापांचं दुःख आहे. सरकार, प्रशासन, राजकारणी, सगळ्यांनी जबाबदारी नाकारली आणि किंमत चुकवली ती या छोट्या जीवांनी.


आज पीपलोद गाव शोकमग्न आहे… पण त्या शोकाच्या आड एक संताप धुमसतोय. ही दुर्घटना नव्हे, तर व्यवस्थेच्या बेफिकिरीचं हत्याकांड आहे आणि त्या हत्येची जबाबदारी कोण घेणार?

Comments
Add Comment

रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटणार? पंतप्रधान मोदींच्या एका फोन कॉलने उडाली खळबळ, जगात मोठी चर्चा!

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यातच भारताचे

कर्करोगविरोधी 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू; ग्राहकांची वर्षाला ₹3,540 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' पुरस्कारांची घोषणा; देशातील स्वच्छ शहरांचा होणार गौरव

नवी दिल्ली: देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा आणि जनजागृती वाढवणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या 10 व्या

उत्तराखंडच्या विकासाची झेप! मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते ‘सशक्त नेतृत्व, विकास की ऊँची उड़ान’ पुस्तिकेचे प्रकाशन

[caption id="attachment_1073883" align="aligncenter" width="800"] उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त देहरादून येथील गोरखा मिलिट्री इंटर कॉलेज, गढी

Kolkata Crime: कोलकात्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या; 25 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू, प्रेयसी आणि आईला अटक

कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे

Iran US War Warning : इराणचा अमेरिकेला थेट अल्टिमेटम : 'युद्ध थांबवा, नाहीतर ४८ तासांत...

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) भू-राजकीय संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणचे