Cipla Q1 Results: बडी फार्मा कंपनी सिप्लाचा तिमाही निकाल जाहीर इतिहासात पहिल्यांदाच तिमाहीत ३००० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई व ईबीटी 'इतक्या' कोटीवर

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या औषध कंपन्यापैकी एक असलेल्या सिप्ला कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनी इतिहासात ६% व्यवसाय वाढल्याने पहिल्यांदाच कंपनीचा व्यवसाय ३०७० कोटींवर पोहोचला असल्याचे निकालात म्हटले गे ले आहे. हा सिप्लासाठी नवा उच्चांक (Record High) कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) एकत्रित निव्वळ नफा १०% अधिक मिळाला ज्यामुळे कंपनीचा निव्वळ एकत्रित नफा (Consolidated Net Profit) १२९८ कोटींवर नोंदवला गेला आहे. व्यापार तज्ञांनी हा अंदाज ११७८ कोटींचा नोंदवला होता ज्यामध्ये अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३.६% वाढ झाली आहे. यामुळे ईबीटा १७१६ कोटींवरून वाढत १७७८ कोटींवर पोहोचला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations ) मध्ये ३.९२% वाढ झाली. ज्यामध्ये हा महसूल मागील वर्षाच्या तिमाहीतील ६६९४ कोटींच्या तुलनेत वाढत या तिमाहीत ६९५७ कोटींवर पोहोचला आहे.कंपनी च्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६% वाढ नोंदविण्यात आली. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत कंपनीला १२९५ कोटींवर पोहोचला आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, करपूर्व नफ्यात (PBT) १७७० कोटींवर पोहोच ला आहे जो मागील वर्षाच्या तिमाहीत (Q1) १६११ कोटी रुपये होता. कंपनीच्या खर्चातही (Expenses) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ४९७८ कोटींच्या तुल नेत वाढत या तिमाहीत ५१७९ कोटींवर खर्च पोहोचला. माहितीनुसार,जूनपर्यंत सिप्लाकडे १०,३७९ कोटी रुपयांची निव्वळ रोख शिल्लक (Net Cash Balance) होती. संशोधन आणि विकास गुंतवणूक ४३२ कोटी रुपये (विक्रीच्या ६.२ टक्के) होती, जी पाइपला इन विकास आणि फाइलिंगवर खर्च झाली आहे. कंपनीने निकालावर म्हटले आहे की,' सिप्लाने मुख्य बाजारपेठांचा विस्तार करणे, प्रमुख ब्रँड मजबूत करणे आणि शाश्वत वाढीसाठी संशोधन आणि विकासाद्वारे नावीन्यपूर्णतेला चालना देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख