शनीमूर्तीवर भाविकांना करता येणार जल अर्पण, श्रावण महिन्यात भाविकांना सेवेची संधी

शनीशिंगणापूर (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यामध्ये भाविकांना शनिदेवाची सेवा मिळावी म्हणून पहाटे ५ ते ७या वेळेत शनिमूर्तीला जलअर्पण करण्याची संधी मिळणार आहे. भाविकांना ओल्या वस्त्रांनी चौथऱ्यावर परवानगी देण्यात येणार आहे. ही सेवा फक्त श्रावण महिन्यासाठीच असेल असा निर्णय शनैश्वर देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.

श्रावण महिन्याला २५ जुलैपासून म्हणजे आजपासून प्रारंभ होत आहे पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शनिशिंगणापूर येथे सर्व भाविकांसाठी शनी देवाच्या चौथऱ्यावर जाऊन जल अर्पण करता येणार आहे. ही सेवा श्रावण मासात म्हणजे २५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे.

शनिशिंगणापूर येथे परिसरातील रोज हजारो भाविक भक्त पहाटे पायी येऊन मंदिर परिसरात स्नान करून ओल्या वस्त्राने शनी चौथऱ्यावर जाऊन कळशी व लोट्याने जल अर्पण करतात. श्रवण महिन्यात अनेक भाविक भंडारा प्रसादाचे आयोजन करत असतात.
Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

'धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको... शिवसेना तुमच्या पाठीशी' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे

गोकुळच्या शासननियुक्त संचालकांच्या मतदानाचा अधिकार कायम; अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग तूर्तास मोकळा झाला

Mumbai Pune Expressway : अटल सेतू ते मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण; प्रवासात 90 मिनिटांपर्यंत बचतीची अपेक्षा

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग

महाराष्ट्रात लिफ्ट सुरक्षेचे नियम कडक; CCTV, विमा आणि मासिक देखभाल अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा

दिवाळीत मच्छीमारांच्या भेटीला जाणार मंत्री नितेश राणे, वर्सोव्यात साधणार संवाद

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार