Koyna Dam's Gates Open: कोयना धरणाचे सहा दरवाजे पुन्हा उघडले, नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ

कराड : पश्चिम घाटमाथ्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे कोयना धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, अखेर धरणाचे  सहा वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे पाच फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद २०,९०० क्युसेक (घनफूट) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा जलविसर्ग कायम आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नद्यांच्या जलपातळी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.


कोयनेचा जलसाठा ७९ टक्क्यांच्या समीप असताना, धरणात जवळपास ५० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या दरवाजातून पटीने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.


३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) राखण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने अचानक बदलले होते. मात्र, आज शनिवारी सकाळी ११ वाजता कोयनेचे दरवाजे चार फुटांनी, नंतर ते सायंकाळी साडेपाच वाजता पाच फुटांपर्यंत उघडण्यात आले.



कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता 


पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक ४९ हजार ४५५ क्युसेकवर पोहचली आहे. आज शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या जलसाठ्यात तब्बल ४.२७ टीएमसी पाण्याची वाढ होऊन हा धरणसाठा ८३.०५ टीएमसी (७८.९१ टक्के) झाला आहे, जलआवक २५,२७९ क्युसेकवरून ४९ हजार ४५५ क्युसेक अशी वाढली आहे.  जोरदार पावसात आवक पाणी, विसर्गाच्या दुप्पट असल्याने कोयनेच्या दरवाजातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रमुख सर्व जलाशयांतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.



पाणलोट क्षेत्रात आजवरचा विक्रमी पाऊस


कोयना पाणलोटात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १८९ मिमी (७.४४ इंच) असा तुफान पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी २,९७४.६६ मिमी (एकूण वार्षिक सरासरीच्या ६०.४९ टक्के) असा विक्रमी पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत कोयना पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वरला ५१, नवजाला ३३, तर कोयनानगरला २३ मिमी, कुंभी धरण ६० मिमी, कडवी ३६, धोम-बलकवडी २६, दूधगंगा ४०, धोम १३, वारणा २१, तारळी १६ मिमी असा धरणांच्या परिसरातील पाऊस आहे. तसेच अन्यत्र, जोर येथे सर्वाधिक ८९ मिमी, प्रतापगडला ७४, पाथरपुंज ६७, दाजीपूर ६३ मिमी, रेवाचीवाडी व मांडुकली येथे ५३ मिमी असा मुसळधार पाऊस झाला आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने