प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिल कॉर्नर येथील सचिन राजू भिसे या प्रियकराला अटक करण्यात आली असून, त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणीची जानेवारी २०२५ मध्ये त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉय सचिनसोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या वडिलांनी या लग्नाला विरोध करत तिला सचिनशी संबंध तोडण्यास सांगितले होते.



वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने सचिनला याची कल्पना दिली. परंतु, सचिनने दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत मुलीकडे आणि तिच्या आईकडे पैशांची मागणी सुरू केली आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.


दरम्यान, ही मुलगी तिच्या आईसोबत बाहेर गेली होती, परंतु ती रस्त्यातूनच घरी परतली. बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी आत जाऊन पाहिले असता, तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सचिनविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

'धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको... शिवसेना तुमच्या पाठीशी' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे

गोकुळच्या शासननियुक्त संचालकांच्या मतदानाचा अधिकार कायम; अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग तूर्तास मोकळा झाला

Mumbai Pune Expressway : अटल सेतू ते मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण; प्रवासात 90 मिनिटांपर्यंत बचतीची अपेक्षा

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग

महाराष्ट्रात लिफ्ट सुरक्षेचे नियम कडक; CCTV, विमा आणि मासिक देखभाल अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा

दिवाळीत मच्छीमारांच्या भेटीला जाणार मंत्री नितेश राणे, वर्सोव्यात साधणार संवाद

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार