प्रेक्षकांची लाडकी 'आम्ही सारे खवय्ये' मालिका लवकरच परत येतेय!

मुंबई: 'झी' वाहिनी प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा मनोरंजनाच्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची लाडकी आणि लोकप्रिय खाद्यसंस्कृतीवर आधारित मालिका 'आम्ही सारे खवय्ये' लवकरच एका नव्या पर्वातून परत येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे.


'झी मराठी' वाहिनीवरील सध्या गाजत असलेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या एका खास भागात खुद्द संकर्षण कऱ्हाडेने हजेरी लावली होती. याच वेळी त्याने 'आम्ही सारे खवय्ये'च्या पुनरागमनाचं 'गुपित' उघड केलं. मालिकेत संकर्षण तिलोत्तमासोबत गप्पा मारत असताना तो म्हणाला, "तू ऐकलंस का? 'आम्ही सारे खवय्ये' परत येतंय!" त्याच्या या एका वाक्याने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला.





हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं.


या घोषणेमुळे 'झी मराठी' वाहिनीने टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा नंबर वन येण्यासाठी जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. एकामागोमाग एक नव्या मालिकांची घोषणा करत वाहिनी प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.


कधी आणि कुठे पाहता येणार?


'आम्ही सारे खवय्ये'च्या या नव्या पर्वाची नेमकी तारीख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या सूत्रसंचालनामुळे या पर्वाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Comments
Add Comment

Amruta Khanvilkar Secrets: अमृता खानविलकरचा मजेशीर खुलासा! आयुष्यातील तीन 'गुन्हे' सांगत अभिनेत्रीने जिंकली मनं

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही आपल्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि दिलखुलास

Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या तिच्या नव्या 'मैत्रेया' (Maitreya)

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदाची दिवाळी झलक; अगस्त्य-आराध्याचा फोटो चर्चेत

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदा हिने बच्चन कुटुंबीयांच्या दिवाळी सोहळ्याचे फोटो शेअर केले. अगस्त्य नंदा आणि आराध्या

Ashok Saraf Lamborghini video: अशोक सराफांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; मामांनी दिलं मजेशीर उत्तर

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि

Aniruddha Kavya Wedding: वऱ्हाड निघालं ग्रीसला... अनिरुद्ध आणि काव्या यांच्या लग्नसोहळ्यासाठी रजनीकांत यांच्यासह पाहुणेमंडळी ग्रीससाठी रवाना

प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांच्या शाही

Blockbuster Sunday Collection: रविवारी बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा दबदबा! 'सीन'चीही दमदार कमाई, 'जेलर 2' आणि 'मूकुथी अम्मन 2'ने किती कोटी कमावले?

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी पाहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा