Fed Rate Cut: शेअर बाजाराचे 'रूपडे' पालटेल अशी बातमी आज युएस फेड व्याजकपातीचा निर्णय होणार! 'ही' आहे माहिती...

मोहित सोमण:आज बाजाराची दिशाच बदलणारा मोठा दिवस ठरू शकतो. २९ ते ३० जुलैला दोन दिवसांच्या विस्तृत चर्चेनंतर आज युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोमी पॉवेल हे फेड व्याजदरावर आपला निकाल घोषित करतील. यामुळे आगामी काळा त फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल की नाही याची रूपरेखा आज स्पष्ट होणार आहे. युएस सीपीआय (Consumer Price Index CPI) म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक तसेच पीसीई (Personal Consumption Expenditure PCE) यामधील आक डेवारीचा आढावा घेत हा निर्णय आज पॉवेल देऊ शकतात. यामुळे युएस बाजारासह इतर शेअर बाजाराचे भवितव्य यावर अवलंबून असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने जेरोम पॉवेल यांच्यावर शाब्दिक हल्ले केले होते. अनेक महिन्यांपासून दर कपात केली नसल्याने ही शेरेबाजी ट्रम्प यांनी पॉवेल यांच्यावर केली. मात्र याविषयी जेरोमी पॉवेल यांनी बोलणे टाळले होते. केवळ 'बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतच पुढील विचार केला जाईल' असे जेरोमी पॉवेल यांनी स्पष्ट केले होते. त्यावरच आजच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंबहुना आज बाजाराला व्याजदरात कपात होईल का गुंतवणूकदारांना यावर ठोस निर्णय घेणे शक्य होईल.

जूनमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत, फेडने अमेरिकेतील करवाढीमुळे होणाऱ्या वाढीव खर्चाच्या जोखमीचा हवाला देत महागाईचा अंदाज सुधारला होता. नवीन अंदाजानुसार,फेडला वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील चलनवाढ ३.१% वर येण्याची अपेक्षा आहे जी सध्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे. जूनमध्ये कोर सीपीआय चलनवाढ दरवर्षी २.९% वाढली. तथापि, बहुतेक फेड धोरणकर्त्यांना चिंता आहे की ट्रम्पच्या करवाढीमुळे महागाई आणण्याच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आजच्या निर्णयावर लक्ष ठेवणे गुंतवणूकदारांना महत्वाचे ठरणार आहे.

अमेरिकेतील बेरोजगारीचा दर जूनमधील ४.१% वरून ४.२% पर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे जो कामगार बाजारातील आगामी घडामोडीत आणखी मंदी दर्शवितो. फेडने गेल्या वर्षी वर्षाच्या अखेरीस बेरोजगारी ४.५% पर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. शुल्क पातळी अखेर कुठे स्थिरावेल याबद्दल अनिश्चितता कायम आहे. त्यामुळेही गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे असा इशारा तज्ञांनी दिला आहे.बहुतेक वॉल स्ट्रीट विश्लेषकांचा अंदाज आहे की टेरिफचा दबाव अद्याप अमेरिकेच्या महागाईत रूपांतरित झालेला नाही. तथापि, त्यांनी इशारा दिला आहे की ऑगस्टपासून करार सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील महागाई वाढेल आणि नजीकच्या काळात ती वाढू शकते ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला