GST Collection: जीएसटी संग्रहणात 'इतक्या' कोटीसह महाराष्ट्रच प्रथम

प्रतिनिधी: महाराष्ट्र जीएसटी संकलनातील योगदानात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्यानंतर कर्नाटक (७%), तामिळनाडू (८%) राज्यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर कर संकलनात नोंद केली. महाराष्ट्राने जुलैपर्यंत ३०५९० कोटींचा कर गोळा के ला आहे. देश पातळीवर बघितल्यास मागील वर्षाच्या जुलैपर्यंत जीएसटी संग्रहणात (Collection) मध्ये १८२०७५ कोटीची वाढ झाली होती. जी तसेच देशपातळीवर जुलै महिन्यातील जीएसटी संग्रहणात (Gst Collection) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७.५% अधिक वाढ होती. सरकारने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीत (Provisional Data) मधील ही माहिती पुढे आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेतही वाढलेल्या आर्थिक देशांतर्गत उलाढालीने ही वाढ झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

इयर टू डेट (Year to date) बेसिसवर जीएसटी संग्रहणात १०.७% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या याच जुलै महिन्यात संग्रहण ७.३९ लाख कोटी होते ते वाढत या जुलैपर्यंत ८.१८ लाख कोटींवर गेले आहे. घरगुती महसूलात ६.७% वाढ झाली असून ती वाढ १.४३ लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर जीएसटी परतावा (Refund) माध्यमातून इयर ऑन इयर बेसिसवर ६६.८% वाढ झाल्याने संग्रहण परतावा २७१४७ कोटींवर पोहोचला. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनात १२.६% वाढ झाली जी २.३७ लाख कोटींच्या रेकॉर्ड ब्रेक वाढीसह सरकारने नोंदवली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आगामी वर्षात ११% वाढ होईल असे सूतोवाच केले होते.

सरकारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलैमध्ये निव्वळ जीएसटी महसूल १,६८५८८ कोटी होता जो जुलै २०२४ मध्ये १६५८०० कोटी होता, त्यात जुलैत १.७% वाढ झाली आहे. ही मंदावलेली वाढ मुख्यत्वे एकूण परताव्यात ६६.८% वाढ झाल्यामुळे झाली, जी जुलै २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या १६,२७५ कोटी होती, जी वाढून २७,१४७ कोटी झाली आहे. माहितीनुसार मासिक वाढीची मंदी असूनही एप्रिल-जुलै २०२५ साठी एकत्रित निव्वळ जीएसटी महसूल ८.४% वाढून ७.११ लाख कोटी झाला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधी तील ६.५६ लाख कोटी होता. त्यामुळे जीएसटीतील वाढ समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण