टाटा इन्व्हेसमेंट लिमिटेडकडून Stocks Splits जाहीर शेअर 'या' निकालामुळे उसळला !

प्रतिनिधी: टाटा समूहाच्या कंपनीपैकी एक टाटा इव्हेंसमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर काही क्षणापूर्वी जाहीर केला आहे. त्यातील माहितीनुसार कंपनीच्या एकत्रित करोत्तर नफ्यात (Consolidated PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ११.६% वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा १४६.३ कोटींवर पोहोचला जो मागील तिमाहीत १३१.०७ कोटी होता. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसि सवर २.१% वाढ झाली. मागील तिमाहीत महसूल १४२.४६ कोटी होता जो वाढत या तिमाहीत १४५.४६ कोटींवर गेला आहे.कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात (Income from Operations) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील १४०.९५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत वाढत उत्पन्न १७०.४६ कोटींवर गेले.

पहिल्यांदाच Stock Split साठी संचालक मंडळाची परवानगी -

टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशनने पहिल्यांदाच आपल्या शेअर्सच्या एका शेअरचे दोन शेअर्समध्ये विभागणी करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने (Borad of Directors) ने मान्यता दिली आहे. १० रुपयांच्या दर्शनी मूल्यासह या शेअर्सची विभागणी होईल यावर अ धिक माहिती पुढे आली नसली तरी १० रूपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरची १ रूपया प्रति शेअर दर्शनी मूल्याप्रमाणे विभागणी होऊ शकते. किरकोळ गुंतवणूकदारांंना अधिक तरलता (Liquidity) व किफायतशीर दरात शेअर उपलब्ध करण्यासाठी कंपनीने धो रणात्मक निर्णय घेतल्याचे आपल्या निवेदनात स्पष्ट केले. या निर्णयाला कंपनीच्या भागभांडवलधारकांची अंतिम परवानगी आवश्यक असते त्याबद्दल अद्याप निर्णय बाकी आहे. मात्र याआधीही कंपनीने २००५ साली १:२ प्रमाणात बोनस शेअर इशू केले होते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ३५४५७.१८ कोटी रुपये आहे.

स्टॉक स्प्लिटबाबत बोलताना टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये (Regulatory Filing) म्हटले आहे की, स्टॉक स्प्लिटचा उद्देश त्यांचे इक्विटी शेअर्स अधिक परवडणारे बनवणे आणि कंपनीच्या मालकीमध्ये व्यापक किरकोळ सहभागा ला प्रोत्साहन देणे आहे. शेअरहोल्डर्सकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनी योग्य वेळी शेअर्सच्या उपविभाजनासाठी रेकॉर्ड डेट जाहीर करेल.

तिमाही निकाल जाहीर होताच कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ -

निकाल (Q1 Results) जाहीर झाल्यावरच कंपनीच्या शेअर्सने ३.८% उसळी मारली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.९३% वाढ झाल्याने प्रति शेअर मूल्य ६९८१ रूपयांवर पोहोचले होते.
Comments
Add Comment

Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसचा भन्नाट नियम! आता पाळीव प्राण्यांसाठी खास सोय, पण बुकिंगचे नियम वाचले का?

Indian Railways News: अनेकांना लांबच्या प्रवासाला जाताना आपल्या पाळीव प्राण्यांना घरी सोडणे कठीण जाते. विशेषतः कुटुंबासोबत

Jio Offer: जिओची दिवाळी बंपर ऑफर! ग्राहकांना मिळणार १० महिन्यांच्या रिचार्जवर ५ महिने मोफत

Jio Offer: खुशखबर! खुशखबर !! खुशखबर !!! तुम्ही जर रिलायन्स जिओचे सिम वापरात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कंपनी आपल्या

Delhi Firecracker Accident : मित्रांसोबत फटाके फोडताना भयंकर घडलं! अल्पवयीन मुलाच्या पोटात रॉकेट घुसला अन्...

दिल्ली : दिवाळीचा सण एका कुटुंबासाठी दुःखद ठरला आहे. दिल्लीतील नरेला परिसरात फटाके फोडताना रॉकेट पोटात

Egypt Railway Accident 2026: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन ट्रेनची टक्कर, 7 जणांचा जागीच मृत्यू

Egypt Railway Accident 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार

Mumbai Fire : मुंबई आणखी एक भीषण घटना; अंधेरीतील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील घराला आग

Mumbai Fire News: अंधेरी पश्चिम येथील राम मंदिर रोडवरील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना 9

Thane Fire : ठाण्यातील रहेजा गार्डन संकुलात अग्नितांडव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरू

Thane News: दिवाळीच्या रात्री ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील रहेजा कार्लाइन या 17 मजली इमारतीला भीषण आग लागली.