Jio Offer: खुशखबर! खुशखबर !! खुशखबर !!! तुम्ही जर रिलायन्स जिओचे सिम वापरात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी! कंपनी आपल्या जिओहोम ग्राहकांना तब्बल पाच महिन्यांची अतिरिक्त सेवा देत आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही फक्त 10 महिन्यांचे पैसे भरून एकूण 15 महिने जिओहोम वापरू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. अन्यथा याऑफरचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. जिओने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने या ऑफरला 'जिओहोम फ्रीडम ऑफर' असे नाव दिले आहे.
लाभ कसा मिळवायचा?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिओने एक विशेष नंबर जारी केला आहे. त्यातून तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत (registerd) नंबरवरून म्हणजे ज्या नंबरवर जिओहोम आहे त्याच नंबरवरून 8219582195 या नंबरवर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि मिस्ड कॉल दिल्यावर जिओकडून तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यात पुढे काय करायचं ते सांगितलेलं असेल. ही छोटी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे 5 महिने फुकटचे सुरु होतील. तुम्ही जर वेगळ्या नंबरवरून कॉल करत असाल तर तुम्हाला ऑफर मिळेलच याची खात्री नाही. तत्पूर्वी, रिचार्ज करण्याआधी, MyJio ॲप किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या कनेक्शनची पात्रता आणि ऑफरच्या अटी एकदा तपासून घ्या.
मात्र, पात्र ग्राहकांना 10 महिन्यांच्या सेवेचे पैसे भरल्यावरच पाच महिन्यांची अतिरिक्त वैधता मिळेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही ज्या कालावधीसाठी पैसे भरले आहेत, त्यापेक्षा अधिक पाच महिने अधिक काळ इंटरनेट आणि मनोरंजन सेवांचा वापर करू शकाल.
या जिओ ऑफरमध्ये महिन्याचे दर ₹666 नमूद आहे. म्हणजेच 10 महिन्यांच्या सेवेसाठी तुम्हाला अंदाजे ₹6,660 लागतील. त्यानंतर ग्राहकांना एकूण 15 महिन्यांची वैधता मिळते, म्हणजेच त्यांना अतिरिक्त पाच महिन्यांसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही ऑफर जिओच्या मोबाईल प्रीपेड किंवा पोस्टपेड रिचार्जसाठी नाही तर ही ऑफर जिओहोम सेवेसाठी आहे, जी जिओफायबर आणि जिओएअरफायबरद्वारे घरी इंटरनेट आणि मनोरंजन सेवा पुरवते.
Egypt Railway Accident 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार धडक झाली. या ट्रेन अपघातात 7 जणांचा ...
छोटा प्लॅन ऑफर
जर तुम्हाला 10 महिन्यांचा रिचार्ज मोठा वाटत असेल तर काळजी करू नका. जिओने छोटा प्लॅनवाल्यांसाठी पण एक ऑफर ठेवली आहे. यात तुम्ही जर 2 महिन्यांचा प्लॅन घेतला तर तुम्हला 1 महिना अगदी फ्री मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळतो. याची किंमत 2,122 रुपये आहे. यासाठी तुम्हाला जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर जाऊन ‘Claim now’ या बटणावर क्लिक करा.
ऑफरचे फायदे
ज्यांच्या घरात रोज नेटचं काम असतं त्यांच्यासाठी ही ऑफर एकदम फायद्याची आहे. 10 महिने पैसे भरून 15 महिने नेट वापरणं म्हणजे 5 महिन्यांचे पैसे वाचले. त्यामुळे जर दिवाळीत नवीन कनेक्शन घ्यायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. तसेच जिओहोम ही केवळ एक ब्रॉडबँड इंटरनेट सेवा नाही. ती थेट टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस देखील देते. प्लॅननुसार, विविध ओटीटी ॲप्स आणि मनोरंजन सेवा देखील तुम्हाला यामुळे उपलब्ध होणार आहेत.