८० वर्षाच्या म्हाताऱ्याला जडलं प्रेम...प्रेमापोटी गमावले तब्बल ९ कोटी

मुंबई: ऑनलाइन फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला ९ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मुंबईतील एका निवृत्त उद्योगपतीने फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाल्यावर तिच्यावर विश्वास ठेवला. या महिलेने अनेक महिन्यांपर्यंत त्याच्याकडून ७३४ वेळा पैसे घेतले.


2023 मध्ये वृद्धाची ओळख फेसबुकवर एका महिलेसोबत झाली. या वृद्ध व्यक्तीने शार्वी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पहिल्यांदा रिक्वेस्ट रिजेक्ट झाली. मात्र काही दिवसांनी महिला स्वत: रिक्वेस्ट पाठवू लागली. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू झाले. हळहळू जवळीक वाढू लागली. त्यानंतर वृद्ध व्यक्तीचा महिलेवरील विश्वास वाढू लागला.


शार्वीने स्वत: घटस्फोटित, दोन मुलांची आई आणि आर्थिक त्रस्त असल्याचे सांगितले. कधी मुलांचे आजारपण तर कधी घरात पैशांची कमतरता असे सांगून ती वृद्ध व्यक्तीकडून पैसे उकळत होती. काही दिवसांनी यात कविता नावाची महिला आली जिने अश्लील मेसेज पाठवल्यानंतर आजारी मुलांच्या उपचाराच्या नावाने पैसे मागण्यास सुरूवात केली.


त्यानंतर यात दीनाज नावाची महिला आली. हिने आपण शार्वीची बहीण असल्याचे सांगितले. तिने सांगितले की शार्वी या जगात नाही. तसेच रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी वृद्ध व्यक्तीकडून पैसे मागितले. तसेच पैसे न दिल्यास आत्महत्या करेन अशी धमकी दिली. यानंतर जास्मिन नावाच्या महिलेनेही त्या वृद्ध व्यक्तीकडून काहीतरी बहाण्याने पैसे उकळण्यास सुरूवात केली. २०२३ ते जानेवारी २०२५ या दरम्यान या वृद्ध व्यक्तीने एकूण ८.७ कोटी रूपये ट्रान्सफर केले. बचत संपल्यानंतर त्या व्यक्तीने सुनेकडून २ लाख उधार घेतले. तसेच मुलाकडून ५ लाख मागितले. मुलाला जेव्हा संशय आला तेव्हा चौकशीदरम्यान सत्य समोर आले. दरम्यान, सत्य समजल्यानंतर वृद्धाला मोठा धक्का बसला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.


यानंतर जुलै २०२५मध्ये वृद्ध व्यक्तीने सायबर क्राइम हेल्पलाईन १९३०वर तक्रार दाखल केली. ६ ऑगस्टला एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये चार महिलांची नावे समोर आली. दरम्यान, पोलिसांना संशय आहे की ही सर्व नावे एकाच व्यक्तीची असू शकतात. दरम्यान, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन