शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या 40 वर्षे जुन्या आणि अत्यंत वर्दळीच्या शहाद रेल्वे ओव्हरब्रिजच्या (ROB) पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. MMRDA कडून 325 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे टेंडर पूर्ण झाले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे हजारो वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 (NH- 61 वरील अत्यंत वर्दळीचा आणि जुना झालेला शहाड उड्डाणपूल आता लवकरच नागरिकांच्या सेवेमध्ये नव्या स्वरूपात दाखल होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 325.93 कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली असून, वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली आहे.



मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सध्याचा उड्डाणपूल हा सुमारे 40 वर्षे जुना असून अत्यंत जीर्ण झाला आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. टिटवाळा- बदलापूर रस्ते रुंदीकरण आणि बळकटीकरण प्रकल्पाचाच हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पांतर्गत तब्बल 199.21 कोटी रुपयांच्या नागरी कामांचा समावेश आहे. वाहतुकीची मोठी कोंडी होऊ नये, म्हणून शहाड रेल्वे स्थानकावरील पुलाचे बांधकाम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.




  • पहिला टप्पा- जुन्या पुलाच्या बाजूलाच एक नवीन दोन लेनचा पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल साई निर्वाण डाउनटाउन सोसायटी समोरून सुरू होईल, मोहने रोड ओलांडून शहाड रेल्वे स्थानकावरून उल्हासनगरच्या दिशेने जाईल. उल्हासनगर बाजूला पॅराडाईज प्लाझाजवळ एक रॅम्प जोडला जाईल, तर मुरबाडकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी डी-मार्टजवळ एक वेगळा मार्ग असेल.

  • दुसरा टप्पा: नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर, जुना उड्डाणपूल टप्प्याटप्प्याने पाडला जाईल आणि त्याच्या जागी दुसरा दोन लेनचा पूल तयार केला जाईल.


 


भिवंडी, मुरबाड आणि अहमदनगरकडून येणारी जड आणि हलकी वाहने याच अरुंद पुलावरून जात असल्यामुळे या पुलावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतो. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे रुळांवर दोन नवीन पुलांमुळे चार लेनचा मार्ग उपलब्ध होईल. यामुळे कल्याण, उल्हासनगर आणि मुरबाडमधील प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होईल तसेच जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग मिळाल्यामुळे स्थानिक वाहतूक सुरळीत होईल.


Comments
Add Comment

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय', फेऱ्यांचा त्रास संपणार

ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर,

Western Express Accident: अंधेरीत हिट अँड रन! भरधाव कारची दुचाकीला धडक; बँकर जोडपे जखमी, चालक फरार

अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी मोटारसायकल आणि कारच्या

पनवेल- वसई थेट लोकल! 12710 कोटींचा प्रस्ताव अन् 17 रेल्वे स्टेशन; कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (MMR) रेल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या आहेत. पनवेल

Mumbai Fire Incident: अंधेरीतील उंच इमारतीला भीषण आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका