LIC Q1 Results: एलआयसीचा तिमाही निकाल जाहीर शेअर 'इतके' टक्के उसळला !

प्रतिनिधी: काल एलआयसी (Life Corporation of India LIC) या देशातील सर्वात मोठ्या व जुन्या विमा कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला होता. कंपनीच्या नफ्यात समाधानकारक वाढ झाल्यानंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये बाजार सुरू झाल्यावरच इं ट्राडेत ४.९१% म्हणजे जवळपास ५% वाढ झाली होती. सकाळी १०.५० वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्सने ३.०५% उसळी घेतली आहे. एलआयसीने पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने बाजारातील लाईफ विमा, व तत्सम विमा उत्पादने कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना आश्वासकता दिसल्याने ही वाढ झाली. कंपनीने काल जाहीर केलेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीला पहिल्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५% नफा झाला होता. कंपनीच्या एकूण एकत्रित नफ्यात (Consolidated Profit) मध्ये ४.११% वाढ झाली. कंपनीच्या प्रिमियममधून मिळणाऱ्या मिळकतीत (Income from Premium) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ५% वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढ १.१९ लाख कोटींवर गेली. कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीने व्यक्तिगत प्रिमियम मिळकत ६ % वाढून ७१४७४ कोटीवर गेली आहे तर समुहाच्या प्रिमियम मिळकत (Group Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २.४६% वाढ झाली आहे. जी ४७७२६ कोटींवर गेली असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

एलआयसीच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) मध्ये ६% वाढ झाली असून ती ५७.०५ लाख कोटीवर गेली आहे. कंपनीच्या व्हॅल्यु ऑफ न्यू बिझनेस (VNB) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २१% वाढ झाली आहे जी १९४४ कोटींवर पोहोचली आहे. विशेषतः आर्युविमा क्षेत्रातील एलआयसीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. एलआयसीचे आजही ६३.५१% मार्केट शेअर कायम राखत विमा क्षेत्रातील आपली मक्तेदारी एलआयसीने कायम ठेवली आहे.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या बाबतीत आमचा एकूण बाजार हिस्सा ६३.५१% होता आणि आम्ही वैयक्तिक आणि गट व्यवसायात आमचे नेतृत्व कायम ठेवले आहे. आमच्या धोरणाचे प्रमुख घटक, जसे की वैयक्तिक व्यवसायात नॉन पार शेअरमध्ये वाढ, व्हीएनबी मार्जिनमध्ये वाढ आणि बँका शेअरमध्ये वाढ, पूर्णपणे योग्य मार्गावर आहेत' असे एलआयसीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आर दोराईस्वामी म्हणाले आहेत.

दोराईस्वामी पुढे म्हणाले,' एपीई (Annualised Premium Equivalent APE) आधारावर, वैयक्तिक विभागातील नॉन पार उत्पादनांचा वाटा आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ३०.३४% पर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत २३.९४% होता. वार्षिक आधारावर व्हीएनबी मार्जिन १५० बीपीएसने १५.४% पर्यंत वाढला आहे, तर या तिमाहीत आमचा खर्च गुणोत्तर १४० बीपीएसने कमी होऊन १०.४७% झाला आहे.' ३० जून २०२५ पर्यंत, १.९ लाखांहून अधिक महिलांना विमा सखी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ज्यांनी आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ३.२६ लाखांहून अधिक पॉलिसी विकल्या, असेही त्यांनी सांगितले आहे. काल ७ ऑगस्टला कंपनीचा शेअर ०.७% घसरुन ८८६.४० रूपये प्रति शेअर किंमतीवर बंद झाला होता.
Comments
Add Comment

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार