चार उड्डाणपुलांच्या आराखड्याला रेल्वेची मंजुरी

निधी मागणीसाठी 'एमएमआरडीए'कडे प्रस्ताव


विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार नियोजित उड्डाणपुलांच्या संकल्पना आराखड्याला (जनरल अरेंजमेंट डिझाईन) रेल्वेने मंजुरी दिली आहे. उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर या ठिकाणी हे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून या पुलांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी महापालिकेला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी रेल्वे वसई, नालासोपारा आणि विरार या तीनही रेल्वे स्थानक परिसरात होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. वसई - विरार महानगरपालिका ने शहरात ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता. त्यामध्ये वसई -नायगाव स्थानकादरम्यान उमेळमान, नालासोपारा येथील अलकापुरी, विरारच्या विराट नगर येथे आणि नालासोपारा विरार दरम्यान ओस्वाल नगरी येथे अशा चार उड्डाणपूलांचा समावेश आहे.


दरम्यान, उड्डाणपुलाच्या निमिर्तीसाठी रेल्वेची परवानगी आवश्यक असल्याने महापालिकेने चार ठिकाणी नियोजित रेल्वे उड्डाणपुलांची जनरल अरेंजमेंट डिझाईन तयार करून रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला पाठविली होती. मात्र, त्याला अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली नव्हती. तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर पश्चिम रेल्वेने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी मिळालेली रेल्वेची मंजुरी आणि इतर कागदपत्र एमएमआरडीएकडे निधीच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अंतिम मंजुरीनंतर हे उड्डाणपूल एमएमआरडीए आणि रेल्वेच्या रुळावरील भाग हा रेल्वेतर्फे बांधण्यात येणार आहे.


११ उड्डाणपुलांच्या कामाला गती

नायगाव ते विरार दरम्यान उमेळमान, अलकापुरी, ओसवाल नगरी आणि विराट नगर येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वेच्या चार उड्डाणपुलांसह शहरातील आणखी ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला त्रस्त झेलेल्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वसई विरार मधील रखडलेल्या ७ उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळावी म्हणून आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.अधिवेशनात सुद्धा हा विषय त्यांनी लाऊन धरला. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अकराही उड्डाणपूल वाहनधारकांसाठी दिलासादायक
ठरणार आहेत.

रेल्वे उड्डाणपुलासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

रेल्वेच्या ४ उड्डाणपुलांसाठी आजी - माजी आमदारांसह खासदारांनी पाठपुरावा केला आहे. वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी या कामासाठी एमएमआरडीए आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वेच्या आराखडा मंजुरीसाठी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि नालासोपाराचे विद्यमान आमदार राजन नाईक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आले असून अखेर रेल्वे तर्फे संकल्पना आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Palghar Gas Leakage : पालघरमध्ये हायड्रोजन गॅसची गळती! मुंबई-गुजरात महामार्गावर १२ तासांचे थरारक आपत्कालीन ऑपरेशन

१३ सिलिंडरची गळती रोखली, १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले मुंबई : मुंबई-गुजरात (Mumb

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कारखान्यातील भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

बाईईईई हा काय प्रकार! डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड ? शाळा प्रशासनाचा अजब अट्टाहास

मुंबई : मिरा-भाईंदर (Mira-BHayandar) परिसरातील शाळांमध्ये पर्यूषण पर्वाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आहारावर लादल्या

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे

Vasai factory accident : वसईमध्ये कारखान्यात मोठी दुर्घटना : ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने ५४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी