ट्रम्पनी जाहीर केले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी ४३८ कोटींचे बक्षीस

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम दुप्पट केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आता मादुरो यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यास ५० मिलियन डॉलर्स (सुमारे ४३८ कोटी रुपये) इतके बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मादुरो यांना जगातील सर्वात मोठा ड्रग्स तस्कर मानले जात असून, त्यांनी अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनचा पुरवठा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.



२०२० पासून आरोप कायम, बक्षिसाची रक्कम केली दुप्पट


मादुरो यांच्यावर २०२० मध्ये पहिल्यांदा आरोप लावण्यात आले होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथील संघीय न्यायालयात नार्को-टेररिझम आणि कोकेन आयात करण्याच्या कटाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावर १५ मिलियन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळात ही रक्कम २५ मिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली. आता ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा ही रक्कम दुप्पट करून ५० मिलियन डॉलर्स केली आहे.


हे बक्षीस ओसामा बिन लादेनवर ठेवलेल्या बक्षिसापेक्षाही जास्त आहे, हे विशेष. 'राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली मादुरो न्यायापासून वाचू शकणार नाहीत आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल,' असे ऍटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे व्हेनेझुएला आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

जपान हादरले! मध्य जपानमध्ये 5.7 तीव्रतेचा महाभूकषक; डझनभर नागरिक जखमी

जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पहाटे

Yemen Airstrikes: सौदीच्या हल्ल्याने येमेन हादरले! 13 चिमुकल्यांसह 33 जणांचा मृत्यू

येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या रक्ताच्या नद्या वाहणाऱ्या हवाई

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

Code 100 : इराणमध्ये 'कोड 100' जारी, संपूर्ण लष्कर हाय अलर्टवर ? पश्चिम आशियात युद्धाचे सावट

Code 100 :संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम