‘माधुरी’वर उपचारासाठी महाराष्ट्रात योग्य जागेचा प्रश्न

मुंबई: नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘माधुरी’(महादेवी) हत्तिणीच्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर बॉम्ब टाकून माधुरीच्या आरोग्याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण केला आहे. सोशल मीडियावर ‘पेटा इंडिया’ने माधुरीसाठी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य जागा असल्याचा निर्वाळा दिला आहे. माधुरीला पुन्हा साखळदंडाने बांधणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केल्यामुळे माधुरीचा नांदणी प्रवास लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.


मुख्यमंत्री फडणवीस माधुरीच्या ‘घरवापसी’साठी पाठपुरावा करत असतानाच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘माधुरी’ पुन्हा नांदणीला परतावी, यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.


भट्टारकांच्या मृत्यूचा उल्लेख
या निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की, मानसिक त्रासामुळे हत्ती कधीकधी आक्रमक होतात आणि माधुरीनेही स्वामीजींचा म्हणजे भट्टारकांचा जीव घेतला होता. यामुळे माधुरीसाठी शांत, मोकळा परिसर, पाण्याचे स्त्रोत, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि इतर हत्तींची संगत मिळणे अत्यावश्यक आहे.


पेटाकडून उत्तर प्रदेश, कर्नाटकचा पर्याय
सध्या महाराष्ट्रात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. मात्र वनतारा (गुजरातमधील केंद्र) ही सुविधा हे सर्व काही देते. जर महाराष्ट्रातही वनताराच्या दर्जाची सुविधा निर्माण झाली, तर तिथे माधुरीला ठेवण्यास ते तयार आहेत. उत्तर प्रदेशातील ‘वाईल्डलाईफ सोस’ किंवा कर्नाटकमधील ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू आणि रिहाबिलीटाटीयन सेंटर’मध्ये जर तिला योग्य निवृत्ती जीवन मिळाले, तर तिथे पाठवण्यालाही त्यांचा विरोध नाही. पेटा इंडियाचा एकमेव उद्देश असा आहे की, माधुरीला हक्काचे, शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक व मानसिक पुनर्वसनासाठी योग्य ठिकाण मिळावे. सर्वोच्च न्यायालयानेही हे सुनिश्चित केले होते आणि जर हा मुद्दा पुन्हा उचलला गेला, तर पुन्हा योग्य निर्णय होईल, असा विश्वास पेटाने व्यक्त केला आहे.


न्यायालयीन आदेशास पाठिंबा


‘पेटा इंडिया’ने १६ जुलै २०२५ रोजी आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास पाठिंबा दर्शवला आहे. या आदेशात माधुरीच्या आरोग्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मानवाप्रमाणेच हत्तींसाठी रुग्णसेवा, विशेष उपचार व निवृत्ती आवश्यक असल्याचे पेटाने स्पष्ट केले आहे. माधुरीला ग्रेड-४ अर्थरायटिस, वेदनादायक फूट रॉट (पायांची विकृती), डोके हलवण्यासारखे मानसिक त्रासाचे लक्षण असणारे वर्तन दिसून येत आहे. ही सर्व लक्षणे तीव्र मानसिक त्रासाचे निदर्शक आहेत. गेली ३३ वर्षे ती एकाकी, साखळदंडात आणि काँक्रीटच्या जमिनीवर राहिली असून, त्यामुळे तिच्या वेदनांमध्ये भर पडली आहे. न्यायालयाने तिला चांगले वैद्यकीय उपचार, साखळींपासून मुक्तता आणि इतर हत्तींच्या संगतीत जगण्याचा हक्क दिला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने