बेस्टच्या पतपेढीची निवडणूक यंदा गाजणार

ठाकरेंच्या पॅनलला राणे, दरेकर, लाड, पावसकर यांचे आव्हान


मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा राजकारण रंगणार आहे. आधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत एक पॅनल तयार केलेले असताना आता ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी महायुतीनेही मोर्चेबांधणी केली आहे. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंत्री नितेश राणे आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी एकत्र येऊन एक पॅनल तयार केले आहे. त्यामुळे यंदा ही निवडणूक चुरशीची होणार आहे.


मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्व पातळ्यांवर या राजकारणातील युती आणि आघाड्यांना सुरुवात झाली आहे. त्याचाच प्रत्यय बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीतही येऊ लागला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.


या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. बेस्टचे बहुतांश कामगार, पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. कित्येक कर्मचारी हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत.


शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असून दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहे.


महायुतीच्या नेत्यांना आणखी दोन संघटनांची साथ
महायुतीमधील या नेत्यांच्या तीन संघटनांना बेस्टमधील आणखी दोन संघटनांनी साथ दिली आहे. त्यात महेंद्र साळवे यांची बेस्ट एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन व दिवंगत मनोज संसारे यांचा बहुजन संघ अशा दोन संघटनांचाही महायुतीच्या पॅनेलमध्ये
समावेश आहे.

भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांचे राजीनामे
सुमारे ८४ वर्षांचा इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संचालक मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होते. या काळात या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेक सभासदांनी सोसायटीचे राजीनामे दिले. परिणामी यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या सभासदांची संख्या निम्म्यावर आली. ‘अ’ श्रेणीमध्ये असलेली सोसायटीची श्रेणी घसरून गेली ४ वर्षे ‘ब’ श्रेणीमध्ये आलेली आहे असा आरोप पवार यांनी केला आहे.
Comments
Add Comment

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून

शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय', फेऱ्यांचा त्रास संपणार

ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर,

Western Express Accident: अंधेरीत हिट अँड रन! भरधाव कारची दुचाकीला धडक; बँकर जोडपे जखमी, चालक फरार

अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी मोटारसायकल आणि कारच्या