मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी या सणाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जोरात सुरू आहे. अशा वेळी मुंबईतून एक दुःखद बातमी आली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये केतकीपाडा परिसरात दहीहंडीच्या सरावावेळी ११ वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव याचा सरावावेळी उंचावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला.

सराव सुरू होता, महेश वरच्या थरावर पोहोचण्यासाठी वेगाने हालचाली करत होता. पण चढत असताना त्याचा तोल आणि घात झाला. तो जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी जास्त वेळच मिळाला नाही.

दहिसर पोलिसांनी महेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे.

यंदा १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. हजारो गोविंद पथके या उत्सवात सहभागी होतात. जिद्दीने आणि उत्साहाने गोविदा पथके सण साजरा करतात. मानवी मनोऱ्यांचा थरार साऱ्यांना अनुभवायला मिळतो. दिवसभर विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडून मोठमोठी बक्षीसे गोविंदा पथक पटकावतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. यामुळे सुरक्षेची काळजी घेणे महत्वाचे असते. ताज्या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर