ऑक्टोबर महिन्यातही रेपो दर कपातीची शक्यता मावळली

SBI Report मधील महत्वाची माहिती समोर


प्रतिनिधी: ऑक्टोबर महिन्यात रेपो दर कपातीची शक्यता मावाळली आहे. एसबीआय (State Bank of India SBI) च्या नव्या अहवालानुसार,ऑक्टोबर महिन्यात दरकपातीला आरबीआय लगाम लावेल अशी शक्यता आहे. रिपोर्टमध्ये नक्की म्हटल गेलं आहे  की,'ऑगस्ट महिन्यात महागाईची आकडेवारी २% पर्यंत जाऊ शकते जी २.३% पातळीच्या जवळ आहे. जरी पहिल्या व दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी आपण पाहिली तरी डिसेंबर महिन्यातही दर कपातीची शक्यता नाही ' असे अहवालात नमूद केली आहे.


जुलै महिन्यात किरकोळ महागाईत (Consumer Price Index) मध्ये मोठी घसरण झाली आहे. ९८ महिन्यातील सर्वाधिक कमी पातळी किरकोळ हेडलाईन इन्फ्लेशन (महागाईने) गाठली आहे.जून महिन्यातील २.१०% तुलनेत जुलै महिन्यात १.५५% पातळीवर किरकोळ महागाई गेली आहे. अन्न महागाई निर्देशांकात ७८ महिन्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. जुलै महिन्यात अन्न महागाईत (Food Inflation) मध्ये जून महिन्यातील ७५ बेसिस पूर्णांकाने महागाई जुलै महिन्यात घसरली. २०१९ जानेवारी (२.२४%) नंत र सर्वाधिक घसरण जुलै महिन्यात (१.७६%) झाली आहे.


कोर महागाई (Core Inflation) मध्ये मध्ये मोठी घसरण झाली आहे. आधीच्या ४% कोर इन्फेक्शन (Inflation) मध्ये सहा महिन्यांत ३.९४% वर घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, सोन्याच्या महागाईत (Gold Inflation) मध्ये जुलै २०२५ महिन्यात तब्बल १०० बेसिस पूर्णांकाने घसरण झाल्याने महागाई २.९६% वर पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या वित्तीय पतधोरण समिती निकालानुसार यावेळी जुलै महिन्यात दरकपात झालेली नाही. रेपो दर ५.५०% वर जैसे थे ठेवण्यात आला आहे. यापूर्वी जून महिन्यात रेपो द रात ६.००% वरून ५० बेसिस पूर्णांकाने कपात करत ५.५०% वर रेपो दर आरबीआयने घोषित केला होता त्यामुळे त्या कालावधीत बाजारातील चलनी तरलता वाढली होती. ज्याचा फायदाही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी झाला होता.


अहवालातील निरीक्षणानुसार, बाँड यिल्ड (Bond Yields) मधील उत्पन्नही सर्वसाधारण असू शकते. जागतिक टॅरिफ संकटामुळे व भूराजकीय कारणांमुळे ही वाढ मर्यादित राहू शकते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण