'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात पाकिस्तानच्या वायुदलाची एफ-१६ विमाने नष्ट झाल्याच्या भारताच्या दाव्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळत 'तुम्ही या संदर्भात पाकिस्तान सरकारशी संपर्क साधावा' असे म्हटले आहे.


पाकिस्तानच्या वायुदलाकडे असलेली एफ-१६ विमाने अमेरिकेकडून मिळाली आहेत. त्यामुळे, या विमानांशी संबंधित सर्व माहिती अमेरिकेकडे असते. या विमानांची देखरेख करण्यासाठी अमेरिकेची एक २४ तास कार्यरत तांत्रिक टीम पाकिस्तानमध्ये तैनात असते. दोन्ही देशांमधील करारानुसार पाकिस्तानला ही विमाने युद्धात वापरण्याची परवानगी आहे, आणि त्यामुळेच अमेरिकेला आपली टीम तिथे ठेवावी लागते. ही टीम एफ-१६ विमानांच्या स्थिती, देखभाल आणि ऑपरेशनल माहितीवर सतत लक्ष ठेवते. सध्या पाकिस्तानकडे सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत.


२०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकनंतर झालेल्या हवाई संघर्षात भारताने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ मधून एक एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यावेळी अमेरिकेने तातडीने निवेदन जारी करत, 'पाकिस्तानमधील एफ-१६ विमानांची मोजणी केली असून, कोणतेही विमान गायब नाही,' असे म्हटले होते. पण आता 'ऑपरेशन सिंदूर'च्या प्रकरणात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे वेगळी असून, त्यांनी मौन बाळगले आहे.


भारताचा असा ठाम दावा आहे की, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानची अनेक एफ-१६ विमाने नष्ट झाली आहेत. ही विमाने कधी भारतीय हल्ल्यांमुळे जमिनीवर, तर कधी हवाई संघर्षात नष्ट झाली. या ऑपरेशनच्या तीन महिन्यांनंतर, भारतीय वायुदलप्रमुखांनी नुकतेच सांगितले की, 'शाहबाज-जैकबाबाद हे एक महत्त्वाचे एअरबेस होते, जिथे आमचा हल्ला झाला. तिथे एक एफ-१६ हँगर होता, जो अर्धा नष्ट झाला आहे. मला खात्री आहे की, त्यात काही विमाने होती, जी त्यावेळी नष्ट झाली आहेत.' या संपूर्ण प्रकरणात अमेरिकेची सावध भूमिका भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय बनली आहे.

Comments
Add Comment

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

जपान हादरले! मध्य जपानमध्ये 5.7 तीव्रतेचा महाभूकषक; डझनभर नागरिक जखमी

जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पहाटे

Yemen Airstrikes: सौदीच्या हल्ल्याने येमेन हादरले! 13 चिमुकल्यांसह 33 जणांचा मृत्यू

येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या रक्ताच्या नद्या वाहणाऱ्या हवाई

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

Code 100 : इराणमध्ये 'कोड 100' जारी, संपूर्ण लष्कर हाय अलर्टवर ? पश्चिम आशियात युद्धाचे सावट

Code 100 :संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम