ठाण्यात या गोविंदा पथकाने लावले १० थर, टाळ्यांच्या कडकडाटात झाले कौतुक

ठाणे : मुंबई ठाण्यासह सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. या उत्साही वातावरणात एक आनंदाची बातमी आली आहे. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात एका गोविंदा पथकाने सात, आठ किंवा नऊ नाही तर चक्क दहा थर लावले आहेत.

कोकण नगर या गोविंदा पथकाने ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात चक्क दहा थर लावण्याची कमाल केली आहे. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते. कोकण नगर या गोविंदा पथकाने हे आव्हान पेलले आणि ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात दहा थर लावून सलामी दिली. काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कोकण नगर या गोविंदा पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना उपमुख्यमंत्री शिंदे भावुक, म्हणाले, ''हीच खरी दिवाळी''

आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हा फक्त 10 मिनिटांत; कसे ते जाणून घ्या

Diwali Makeup Tips: सध्या सगळीकडे दिवाळी सणानिमित्त सगलिकडे आनंदाचे वातारण आहे. नवीन कपडे घालून, छान तयार होऊन रोषणाईत फोटो

Amitabh Bachchan on health: अमिताभ बच्चन यांची तब्येतीबाबत पोस्ट, हाताला त्रास असल्याने चाहत्यांची मागितली माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती.

Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

[caption id="attachment_1073577" align="alignnone" width="800"] गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची