चिपळूण-कराड मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, गाड्यांचा चुराडा

कराड: चिपळूण-कराड महामार्गावरील वाशिष्टी डेअरीजवळ पिंपळी कॅनॉलवर सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक, थार गाडी व रिक्षा अशा ३ वाहनाच्या झालेल्या या अपघातात ५  जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षामधील ४ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातात रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. धुके आणि मुसळधार पाऊस यामुळे वाहने दिसली नसल्यामुळे मोठा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे व उद्विग्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बेले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भारताच्या पहिल्या सिंधुदुर्गातील अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पाचा गौरव, ‘आयएनएस गुलदार’ला पुरस्कार

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या पर्यटन विभागाचा सन्मान करण्यात आला आहे.

Uran Water Shortage: उरणकरांनो पाणी जपून वापरा! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांवर पाणी कपातीचे संकट

उरण: उरण शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे उरण शहरातील

कोकणवासीयांनो, सावंतवाडी- मुंबई CSMT ट्रेनच्या वेळेमध्ये बदल; कधीपासून लागू होणार नवा टाइम टेबल?

मुंबई: कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सावंतवाडी रोडवरून मुंबई सीएसएमटीकडे दररोज धावणाऱ्य

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य