Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १२ हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईवरून कोकणामध्ये जाणाऱ्या नोकरदारांसाठी १२ गणपती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून या हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.



मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून गणपती स्पेशल ट्रेन्स १२ सप्टेंबरपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दिवा, पनवेल आणि पुणे अशा वेगवेगळ्या पाच स्थानकांतून ट्रेन सोडल्या जाणार आहेत. यामुळे कोकणवासीयांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 01151 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01447 डाऊन पुणे- रत्नागिरी एक्स्प्रेस, 01171 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 09110 विश्वामित्री- रत्नागिरी एक्सप्रेस, 09019 डाऊन मुंबई सेंट्रल- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01153 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी एक्स्प्रेस, 01103 डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01167 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी एक्स्प्रेस या एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून धावणार आहेत.

 



याशिवाय, मेमू ट्रेन्स सुद्धा मध्य रेल्वेकडून सोडल्या जाणार आहेत. 01155 डाऊन दिवा- खेड मेमू ट्रेन, 01133 डाऊन दिवा- चिपळून मेमू ट्रेन आणि 01103 डाऊन पनवेल- चिपळून मेमू ट्रेन अशा तीन वेगवेगळ्या मार्गांवरून मेमू ट्रेन सोडल्या जाणार आहेत. या गणपती विशेष ट्रेन्समुळे गणेशभक्तांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून या विशेष ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे. १२ सप्टेंबरला या गणपती विशेष ट्रेन्स आपल्या ठिकाणावरून कोकणामध्ये जाण्यासाठी रवाना केल्या जाणार आहेत. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिले रिझर्व्हेशन करूनही अनेकांना तिकिट उपलब्ध होत नाही. याच आधारावर आता मध्य रेल्वेने गणेभक्तांसाठी विशेष ट्रेनची सोय केलेली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी