गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ‘शंकराचा बाळ आला’ भक्तिगीत सज्ज

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी ‘शंकराचा बाळ आला’ भक्तिगीत सज्ज रसिकांच्या भेटीला आले आहे. यामध्ये गायिका वैशाली माडे यांच्या सुरेल आवाजात, मंदार चोळकर यांच्या ओजस्वी शब्दरचनेत आणि वरुण लिखाते यांच्या सुंदर संगीतामध्ये सजलेलं हे गीत भक्तीभाव, कुटुंब आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम आहे. या गाण्यात सैनिक आईची हृदयस्पर्शी कथा मांडली आहे गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाचे पूजन करून पुन्हा देशसेवेसाठी निघते. भक्तीभावासोबत देशभक्तीचा संदेश देणारे हे गीत प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे. कलाकार योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण अभिनय, अभिजीत केळकर यांची ऊर्जा आणि आरव आयेरचा निरागस आनंद हा प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देतो. दिग्दर्शक पराग सावंत यांच्या दिग्दर्शनात आणि पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित हे गीत गणेशोत्सवाच्या चैतन्याला नवा स्वर देणार आहे.

Comments
Add Comment

Amitabh Bachchan on health: अमिताभ बच्चन यांची तब्येतीबाबत पोस्ट, हाताला त्रास असल्याने चाहत्यांची मागितली माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती.

Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

[caption id="attachment_1073577" align="alignnone" width="800"] गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

कतरिना विकीने चाहत्यांना दिलं दिवाळी गिफ्ट! मुलगा विहानचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांचा मुलगा विहानसोबत पहिला स्पष्ट फोटो शेअर करत चाहत्यांना यावर्षी दिवाळीचे

Big Boss 20: माही विजची सलमान खानने केली बोलती बंद! बिग बॉसच्या निर्मात्यांवरील आरोपांना चोख उत्तर

Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज

लाल साडी, नथ अन् मराठमोळा साज! दिवाळीत पूजा सावंतच्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ

दिवाळीचं औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज