एलविश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला एन्काउंटरनंतर अटक


फरीदाबाद: यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी २' विजेता एलविश यादवच्या गुरुग्राममधील घरावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला फरीदाबाद क्राइम ब्रांचने एका चकमकीनंतर (एन्काउंटर) अटक केली आहे. इशांत उर्फ इशू गांधी असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांच्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



नेमकं काय घडलं?


फरीदाबाद क्राइम ब्रांचला इशांतच्या लपून बसल्याची माहिती मिळाली होती.


पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना पाहताच इशांतने त्यांच्यावर स्वयंचलित पिस्तूलने अंदाधुंद गोळीबार केला.


प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यात इशांतच्या पायाला गोळी लागली. यामुळे तो जागेवरच खाली पडला आणि त्याला अटक करण्यात आली.



एलविशच्या घरावर हल्ला:


गेल्या १७ ऑगस्ट रोजी यूट्यूबर एलविश यादवच्या गुरुग्राममधील घरावर काही हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हेल्मेट घातलेले व्यक्ती त्याच्या घराबाहेर येऊन सुमारे २४ राऊंड गोळ्या झाडताना दिसले होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. हिमांशू भाऊ गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. एलविश यादवने सट्टेबाजीच्या ॲप्सची जाहिरात केल्यामुळे अनेक घरांची वाताहत झाल्याचा आरोप करत हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. या घटनेनंतर एलविश यादव आणि त्याच्या कुटुंबीयांना हरियाणा पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.



इशांतच्या अटकेनंतर पोलीस आता या प्रकरणातील त्याच्या इतर साथीदारांचा आणि या हल्ल्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.






Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि