WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

या नवीन फीचरचे नाव ‘गेस्ट कॉल’ (Guest Call) असे आहे. या फीचरची सर्वात मोठी खास बाब म्हणजे, आता समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ॲप नसले किंवा त्यांचे व्हॉट्सॲपवर अकाउंट नसले, तरीही तुम्ही त्यांच्याशी थेट व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलद्वारे संवाद साधू शकणार आहात.

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतीकारी फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरचे नाव ‘गेस्ट कॉल’ (Guest Call) असे आहे. या फीचरची सर्वात मोठी खास बाब म्हणजे, आता समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ॲप नसले किंवा त्यांचे व्हॉट्सॲपवर अकाउंट नसले, तरीही तुम्ही त्यांच्याशी थेट व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलद्वारे संवाद साधू शकणार आहात.



‘गेस्ट कॉल’ फीचरची मुख्य वैशिष्ट्ये




  • या कॉलिंग सेवेसाठी युझर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

  • या कॉलवर बोलण्यासाठी कोणतीही टाईम लिमिट (Time Limit) नसेल, तुम्ही हवा तितका वेळ संवाद साधू शकता.

  • नेहमीच्या व्हॉट्सॲप कॉल्सप्रमाणेच हे गेस्ट कॉल्ससुद्धा ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड’ (End-to-End Encrypted) असतील. म्हणजेच तुमचे संभाषण पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित राहील.

  • हे फीचर एका व्यक्तीशी बोलण्यासाठी तसेच ग्रुप कॉलिंगसाठीही वापरता येईल.

  • कॉल दरम्यान युझर्सना स्क्रीन शेअरिंग (Screen Sharing) करणे आणि इमोजीद्वारे रिॲक्शन्स (Emoji Reactions) देणे अशा सुविधाही मिळतील.



सुरक्षा आणि प्रायव्हसीची विशेष काळजी


१. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला परस्पर कॉलला जोडता येणार नाही.


२. जो युझर कॉल लिंक तयार करेल, त्याच्या मंजुरीशिवाय (Approval) गेस्ट युझर कॉलवर येऊ शकणार नाही.


३. जर समोरच्या व्यक्तीला कॉल जॉईन करायचा नसेल, तर ती प्राप्त झालेली लिंक दुर्लक्षित (Ignore) करू शकते.


४. कॉल सुरू असताना host (कॉल सुरू करणारा) गरज वाटल्यास कोणत्याही गेस्ट युझरला एका क्लिकवर कॉलमधून बाहेर (Remove) काढू शकतो.



गेस्ट कॉल कसा सुरू करावा ? (स्टेप-बाय-स्टेप पद्धत)


१. कॉल टॅबवर जा: सर्वात आधी मोबाईलमधील व्हॉट्सॲप उघडून 'Calls Tab' वर क्लिक करा.

२. प्लस आयकॉन: तिथे वरच्या बाजूला दिलेल्या '+' (Plus) चिन्हावर क्लिक करा.

३. लिंक जनरेट करा: त्यावर क्लिक करताच एक Call Link तयार होईल.

४. लिंक शेअर करा: ही लिंक तुम्ही एसएमएस (SMS), ईमेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता.



५. थेट संवाद: समोरची व्यक्ती कोणत्याही ॲपची किंवा अकाउंटची गरज न उरता, फक्त त्या लिंकवर क्लिक करून ब्राऊजरद्वारे (Browser) थेट तुमच्या कॉलमध्ये सहभागी होऊ शकेल. गूगल मीट (Google Meet) आणि झूम (Zoom) सारख्या कॉलिंग प्लॅटफॉर्म्सना टक्कर देण्यासाठी व्हॉट्सॲपचे हे नवीन ‘गेस्ट कॉल’ फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Comments
Add Comment

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.

रियाधवरील हल्ल्याचे भीषण पडसाद! इंडिगो-अकासासह अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर 17 ऑक्टोबरपर्यंत टांगती तलवार

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र