Beed Crime :उपमुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

बीड:  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विलास मस्के असे जखमी समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. त्यामुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत, कारवाईला सुरुवात केली आहे.


या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे मारहाण करण्यात आली, याबाबत अद्याप काहीच कळू शकलेले नाही. सध्या विलास मस्के यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


विलास मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीड मधील वैद्यकीय मदत कक्षात गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. दरम्यान हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी विलास मस्के यांच्या नातेवाईकांनी केली आहे.



धारधार शस्त्राने केला वार


हाती आलेल्या माहितीनुसार, बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढले आणि धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व