मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

नागपूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाडे जगवण्यासाठी आणि शेतीकामांसाठी विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत उठवण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून जलसंकट गडद झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून, जिथे खरोखर गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी आणि केवळ शेतीकामाकरिता विंधन विहिरींवरील बंदी येत्या 15 डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच गावात मुक्काम करून ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर सकाळी पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंचांशी आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधला. या संवादादरम्यान लोकप्रतिनिधींनी यंदाच्या भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेले जलसंकट आणि शेतातील पिके मातीमोल होत असल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी उठवणे सरकारसाठी काहीसे कठीण आहे. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतला जात आहे."


?feature=share

मात्र, ही सवलत सरसकट लागू असणार नाही, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि ही बंदी केवळ झाडे जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणीच शिथिल केली जाईल. याचबरोबर, पाण्याची नासाडी टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि जास्तीत जास्त जलपुनर्भरण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीत परिसरातील पशुधनाचा मुद्दाही ऐरणीवर आला. विभागात मोठ्या प्रमाणावर पशुधन असूनही पशू दवाखान्यांची वानवा असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली. या गंभीर समस्येची दखल घेत, गुरांच्या दवाखान्यांच्या परिस्थितीची त्वरित पाहणी करून तातडीने योग्य निर्णय घेण्याचे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.



तसेच, रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांवर बोलताना ते म्हणाले की, निधीच्या कमतरतेमुळे काही कामे अपूर्ण राहिली आहेत, पण आता ती प्राधान्याने पूर्ण केली जातील. जी कामे 75 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहेत, त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होत असलेले नुकसान ही एक गंभीर समस्या बनली असून, यासाठी तार कुंपण योजना आणखी व्यापक करण्यात येणार आहे. विशेषतः जंगलाला लागून असलेल्या शेत जमिनींना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. जलसाठ्यांमधील गाळ काढून ती सुपीक माती शेतात टाकण्याचे कामही सध्या वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान काही महिला सरपंचांनी काही लोक पत्रकार असल्याचे भासवून पैशाची मागणी करत असल्याची धक्कादायक तक्रार केली. यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरला असून पोलिस प्रशासनाला याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.