आयएसआयएस प्रकरणात पुण्यातील डॉक्टरला सहा वर्षांची शिक्षा, कोर्ट म्हणाले - समाजाला धडा मिळाला पाहिजे

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित प्रकरणात पुण्यातील एका डॉक्टरला विशेष न्यायालयाने सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने स्वतःहून गुन्हा कबूल केल्यानंतर ही शिक्षा देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या अशा कृत्यांना आळा बसण्यासाठी समाजात कठोर संदेश गेला पाहिजे, असे मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवले. आरोपी डॉक्टरचे नाव अदनानअली सरकार असे आहे. ते पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी असून एका नामांकित खासगी रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होते. जुलै २०२३ मध्ये या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आयएसआयएस या संघटनेला पाठिंबा दिल्याचा आणि इतर आरोपींसोबत मिळून संघटनेचा प्रसार केल्याचा आरोप होता.


तपास यंत्रणा एनआयएने कोर्टात सांगितले की, आरोपीने धार्मिक प्रवचनाच्या नावाखाली एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून जिहाद, खिलाफत यांसारख्या विषयांवर व्याख्याने दिली जात होती. या माध्यमातून नवीन लोकांना संघटनेकडे आकर्षित करून त्यांची भरती करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. तसेच या ग्रुपवर बॉम्ब आणि छोटी शस्त्रे बनवण्याच्या माहितीचे साहित्य शेअर केले जात असल्याचेही तपासात समोर आले होते. या प्रकरणात यंदा २५ जून रोजी कोर्टाने आरोप निश्चित केले होते. त्यावेळी आरोपीने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते. मात्र २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कोर्टात अर्ज करून स्वेच्छेने गुन्हा कबूल करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कायद्यातील किमान शिक्षा द्यावी किंवा आतापर्यंत तुरुंगात काढलेला काळ हीच शिक्षा मानावी, अशी विनंती केली होती.



आपल्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही, पत्नी, चार मुले आणि वृद्ध आई-वडील आपल्यावर अवलंबून आहेत, तुरुंगवासामुळे कुटुंबावर आर्थिक ताण आला आहे, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. कोर्टाने त्यांना विचार करण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला. ६ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. कोणत्याही दबावाशिवाय हा निर्णय घेतल्याचे कोर्टाने नमूद केले. त्यानंतर विशेष न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी त्यांना दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा सुनावली. हा त्यांचा पहिलाच गुन्हा असला तरी आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. इतर आरोपींविरोधातील खटला मात्र सुरूच राहणार आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी हटवली; झाडे जगविण्यासाठी मोठी घोषणा

महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

Maharashtra CM Farmer Visit: शक्य तिथे इंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

नागपूर: राज्यात एकीकडे दिवाळी सणानिमित्त आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थीतीचा

दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर मोठी कारवाई! 43 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित; 17,824 किलो खाद्यपदार्थ जप्त

मुंबई: दिवाळी सणानिमित्त नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन