पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आणि महामार्गाची विशेष पाहणी केली जात आहे. यादरम्यानच एक मोठी बातमी समोर येत आहे.  रत्नागिरी येथील दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल अचानक खचला असल्याचे वृत्त आले आहे. तब्बल १९६५ साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे खचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील ५० वर्ष जुना असलेला पिंपळी नदीवरील पूल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. या पुलाच्या काही भागांना तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची पाहणी केल्यानंतर कोणताही मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.



पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे दसपटी विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पूल पिंपळी गाणे आणि खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणारा असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने मोठे गैरसोय होत आहे.

Comments
Add Comment

Big Boss 20: माही विजची सलमान खानने केली बोलती बंद! बिग बॉसच्या निर्मात्यांवरील आरोपांना चोख उत्तर

Big Boss 20: लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस 20' प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. रोज

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

सीमेवर जवानांसोबत संरक्षण मंत्र्यांची खास दिवाळी; राजनाथ सिंह म्हणाले, "तुमच्यामुळेच देशात उजळतात दिवे

नाथुला (सिक्कीम): दिवाळीच्या सणानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भारत-चीन सीमेवरील सिक्कीमच्या

नक्षलवाद संपला, पण मानसिक नक्षलवादी अजूनही शिल्लक; बस्तरमधून मोदींचा विरोधकांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने छत्तीसगढमधील बस्तरला भेट दिली. त्यांनी सुरक्षा

व्हाइट हाऊसपासून दुबईपर्यंत भारतीय संस्कृतीचा डंका! परदेशात कशी साजरी झाली धडाकेबाज दिवाळी?

दिवाळी हा केवळ भारताचाच नव्हे, तर आता जगभरात आवडीने साजरा केला जाणारा एक जागतिक उत्सव बनला आहे. अमेरिकेतील

Government Schemes for Tribal Communities: एकाच छताखाली आदिवासींना मिळणार तात्काळ लाभ; न्यायाधीशांच्या उपस्थितीत भरणार शासकीय योजनांचा महामेळावा

Thane: एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार