'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'


मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह इतर अधिकारी या उपस्थित होते.


मंत्री भरणे म्हणाले, रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल. या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे नियोजन करावे. सुपारी संशोधन केंद्रासाठी निधी मंजूर असून प्रस्तावित बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबीं पूर्ण होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.


दिवेआगर संशोधन केंद्र पर्यटनाला चालना देणारे ठरेल – मंत्री आदिती तटकरे


मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, दिवेआगार हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून येथे निर्माण होणारी रोठासुपारी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वाण आहे. हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवीन सुपारी संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, तसेच पर्यटक देखील सुपारी संशोधन केंद्राला भेट देतील अशा दृष्टीने प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्र तयार करावे, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.


Comments
Add Comment

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल, सब वे प्रकल्पाचे ३१ जानेवारी २०२७ पर्यंत करणार पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे

Mid Day Meal : महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह

महिला बचत गटांच्या कामांवर स्थायी समिती असमाधानी शिक्षण समिती अध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यक्त केली

BMC : मुंबईत तब्बल ३४ टक्के पाण्याची गळती, चोरी

महापालिका प्रशासनाच्यावतीने आता प्राधान्याने यासाठी घेतली जाणार मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि आस्थापनांवर अन्न व औषध

रायगडमधील दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार (Diveagar) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या

महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी निमित्त विशेष नाणे अन् टपाल तिकीट होणार प्रसिद्ध , मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराला यश

आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या