R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबरोबरच टीम इंडियाच्या या अनुभवी गोलंदाजाने हे  देखील स्पष्ट केले आहे की, तो जगभरातील विविध लीगमध्ये भाग घेणार आहे.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आता IPL ला ही निरोप


अश्विनने १८ डिसेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. तो आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. जिथे त्याने ९ सामन्यांमध्ये ७ विकेट घेतल्या आणि ३३ धावा केल्या. २०२५ मध्ये सीएसकेच्या संघर्षादरम्यान अश्विन इतर वादांमध्येही अडकला होता.



आर. अश्विनची आयपीएल कारकीर्द


३८ वर्षीय ऑफ-स्पिनर अश्विनने २२१ आयपीएल सामन्यांमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ७.२० होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ४/३४ अशी आहे.  याशिवाय, त्याने ९८ डावांमध्ये ८३३ धावा केल्या. त्यांची सर्वाधिक धावसंख्या ५० अशी होती. अश्विन इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ५ संघांसाठी खेळला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. तसेच त्याने या लीगमध्ये पंजाबचे नेतृत्वदेखील केले होते.



अश्विनने सोशल मिडियावर शेअर केली निवृत्ती पोस्ट




अश्विनने त्याच्या निवृत्ती पोस्टमध्ये लिहिले - "आज माझ्यासाठी एक खास दिवस आहे आणि म्हणूनच एक नवीन सुरुवात देखील आहे, असे म्हटले जाते की प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात घेऊन येतो, माझी आयपीएल कारकीर्द आता संपत आहे, परंतु जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये नवीन क्रीडा अनुभवांचा माझा प्रवास आजपासून सुरू होतो. मला संस्मरणीय अनुभव आणि संधी देणाऱ्या सर्व फ्रँचायझींचा मी आभारी आहे. सर्वात जास्त @IPL आणि @BCCI चे आभार, ज्यांनी आतापर्यंत मला खूप काही दिले आहे. येणाऱ्या काळाचा आनंद घेण्यासाठी मी उत्सुक आहे.'

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून