मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघात पाच गोलंदाजांना स्थान दिले असून त्यापैकी तीन वेगवान आहेत. ज्यांचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करेल. मात्र, शमीला १५ सदस्यीय मुख्य संघात सोडून द्या, त्याला राखीव खेळाडूंच्या यादीतही समाविष्ट केलेले नाही. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेद्वारे शमीने तीन वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते. याआधी त्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात त्याचा शेवटचा सामना खेळला होता. पुनरागमनाच्या पहिल्या सामन्यात (राजकोट) शमीला विकेट मिळाली नाही, मात्र वानखेडे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने तीन बळी घेतले होते.

पाकिस्तानविरुद्ध खेळणे इतर संघांविरुद्ध खेळण्यापेक्षा वेगळे आहे का? किंवा तो एक सामान्य सामना मानला जातो का? असे विचारले असता शमीने, ‘तो अनुभव खरोखरच वेगळा आहे’ असे सांगितले. शमीला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, 'काही लोक मला मुस्लिम असल्यामुळे लक्ष्य करतात, विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर. पण मला त्याची पर्वा नाही, कारण मी काही यंत्र (मशीन) नाही. चांगले आणि वाईट दिवस येतच राहतील. जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळतो, तेव्हा माझे लक्ष्य विकेट घेण्यावर आणि विजय मिळवण्यावर असते, सोशल मीडियावर नाही. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करतो.’

सरकार आणि मंडळाच्या निर्णयांचे पालन

आशिया कप २०२५ मध्ये भारताला १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी एका वृत्तवाहिनीवर शमीला विचारण्यात आले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे का? तेव्हा त्याने थेट उत्तर देणे टाळले आणि सांगितले की, ‘मी वादांपासून दूर राहतो. सामन्यांबद्दलचे निर्णय सरकार आणि बीसीसीआय घेतात. आम्ही त्याचे पालन करतो.’
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून