ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी


पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामध्ये बसचालकाला ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी PMPML प्रशासनाने सर्व चालकांना जबाबदारीपूर्वक बस चालवण्याचे आणि नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन केले आहे.


पीएमपीएमएल बसचे काही चालक हे कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. या नियमभंगामुळे एक अपघातही झाला होता, त्यामुळे यावर रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Regional Transport Officer) आणि PMPML च्या संचालकांनी अशा चालकांच्या असुरक्षित वर्तनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.



ड्यूटी संपेपर्यंत मोबाईल परत मिळणार नाही


PMPML प्रशासनाने दिलेल्या निर्णयानुसार बस चालकांना त्यांचा मोबाईल फोन कॉन्डक्टरकडे सुपूर्द करावा लागेल, आणि ड्यूटी संपेपर्यंत त्यांना मोबाईल परत मिळणार नाही. तसेच हा नियम पाळला नाही तर अशा चालकांचे त्वरित निलंबन केले जाणार आहे. हा आदेश PMPML अंतर्गत कार्यरत खाजगी बस कंत्राटदारांवर (Private Bus Contractors) ही लागू होतो. डिपो व्यवस्थापक (Depot Managers) याची काटेकोर दक्षता घ्यायला सांगितली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,