नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता


काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ तरुणांनी रस्त्यावर येऊन हिंसक आंदोलन केले होते. आंदोलनाला घाबरून सरकारने सोशल मीडियावरील बंदी रद्द केली. ही बंदी रद्द झाल्यानंतर नेपाळच्या तरुणांनी देशातील भ्रष्टाचाराविरोधात हिंसक आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या दबावापोटी अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. ते सहकुटुंब दुबईला जाऊन राजाश्रयासाठी प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.


नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सरकारच्या आदेशानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला आणि २५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर आधी नेपाळच्या गृहमंत्र्यांनी नंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देताना देशाचे नेतृत्व उपपंतप्रधानांकडे सोपवली. या पार्श्वभूमीवर सरकार बरखास्त करावे आणि काळजीवाहू सरकारची स्थापना करावी यानंतर संसद विसर्जित करावी आणि नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.


Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे