पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या काळात तब्बल ३७ लाख १६ हजार ५११ नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. त्याद्वारे महामेट्रोला तब्बल ५ कोटी ६७ लाख २७ हजार ७४१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेट्रो सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतची प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये गणेशोत्सव काळातच मेट्रोने आघाडी घेतली.
मागील महिन्यात २७ तारखेला मोठ्या जल्लोषात वाजतगाजत बाप्पाचे आगमन झाले. त्या दिवशी आणि अगोदर काही दिवसांपासून मेट्रोचे प्रवासी वाढायला सुरुवात झाली. गौरी, गणपती खरेदीसाठी बहुतांश नागरिकांनी मध्यवस्तीतील गर्दीचा पूर्वानुभव लक्षात घेता मेट्रोच्या सार्वजनिक वाहतकीला पसंती देत मेट्रोने प्रवास केला.


त्यानंतर बाप्पाच्या आगमनानंतरच्या दिवशी तर प्रवासीसंख्येत प्रचंड वाढ झाली. मंडई मेट्रो स्थानकाची दैनंदिन प्रवासीसंख्या दुप्पट, तिप्पट झाल्याचे समोर आले. यानंतरचे प्रत्येक दिवस मध्यवस्तीतील मेट्रो स्थानकातील प्रवासीसंख्येत आणि मेट्रोला मिळणार्या उत्पन्नात वाढ होत गेली.


गर्दीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी गर्दीनियंत्रणासाठी सर्व यंत्रणा तैनात केली होती. त्यासोबतच त्यांनी यासाठी पोलिसांचीही मदत घेतली होती. श्रावण हर्डीकर, मेट्रो अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गणेशोत्सवापूर्वीच मध्यवस्तीतील स्थानकांची पाहणी करून गर्दीनियंत्रणाबाबत नियोजन केल्यामुळे अनुचित घटना टाळण्यात मोठे यश मिळाले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी