डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या; अमेरिकेत राजकीय हिंसाचाराची चर्चा

वॉशिंग्टन: अमेरिकेतील प्रसिद्ध पुराणमतवादी (conservative) कार्यकर्ते आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती चार्ली किर्क यांची यूटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 'टर्निंग पॉइंट यूएसए' या त्यांच्या संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या घटनेनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


ही घटना बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी घडली. चार्ली किर्क हे त्यांच्या टर्निंग पॉईंटकडून आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. यावेळी एका वादविवादादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर किर्क यांच्या निधनाची बातमी जाहीर केली आणि त्यांचे वर्णन 'महान' असे केले. ट्रम्प यांनी किर्क यांच्या सन्मानार्थ अमेरिकेतील सर्व राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर खाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला एका संशयिताला ताब्यात घेतले मात्र अद्याप त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अमेरिकेतील राजकारणात वाढलेला वैचारिक संघर्ष आणि राजकीय द्वेष या घटनेसाठी कारणीभूत असल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.


चार्ली किर्क (वय ३१) हे 'टर्निंग पॉइंट यूएसए' या तरुण पुराणमतवादी कार्यकर्त्यांच्या संघटनेचे सह-संस्थापक होते. त्यांनी ट्रम्प यांच्या अनेक प्रचार मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मृत्यूने अमेरिकेतील राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

Code 100 : इराणमध्ये 'कोड 100' जारी, संपूर्ण लष्कर हाय अलर्टवर ? पश्चिम आशियात युद्धाचे सावट

Code 100 :संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चेचे संकेत ! इराणच्या 7 अटींमुळे पेच मात्र कायम

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा भीषण हवाई हल्ला ! 40 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाच्या हवाई हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जपोरिझ्झिया भागातील कोमिशुवाखा गावात 2

Benjamin Netanyahu : बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलला केले सावध; विरोधकांवर गंभीर आरोप करताना म्हणाले, बाहेर इराण, तर देशात...

Benjamin Netanyahu : इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत