दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल !


Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या 'दशावतार’ ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ ची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल ५ कोटी २२ लाख रुपयांची तगडी कमाई करत, मराठी बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा कायम ठेवला आहे.


प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटाने सर्वत्र चांगलीच हवा केली होती, यामुळेच पोस्टरपासून चित्रपटाबद्दल निर्माण झालेलं कुतुहल पुढे टिझरमधून अधिकच वाढलं गेलं आणि नंतर आलेल्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली.  त्याचीच प्रचिती ही चित्रपट प्रदर्शनानंतर मिळणाऱ्या प्रतिसादातून बघायला मिळत आहे.

शुक्रवारी १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या दशावताराचे सुरुवातीला एकूण ३२५ स्क्रिन्समधून केवळ ६०० शोज प्रेक्षकांसाठी होते, शनिवारी हा आकडा ८०० एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो ९७५ असा झाला. या चित्रपटाचे सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून 'दशावतार' ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

‘दशावतार’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळतोय. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा असा आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे.

निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, '' दशावतार’ ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. यामुळे प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघून प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे आम्हाला समाधान आहे.''

चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक दृश्यं आणि ताकदीचं कथानक यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे वळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत असून 'दशावतार' ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही राज्य करायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवताना दिसून येत आहेत.

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’