आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आयुष्य आपलं  संपवलं आहे. आईने केवळ अभ्यास करायला सांगितले म्हणून मुलीने थेट टोकाची भूमिका घेतली असल्याचं म्हंटल जात आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली.


विशाखा अनिल वक्ते असे मृत तरूणीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी भागात राहत होती.  विशाखा नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, तिचे वडील एका कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विशाखा टिव्ही पाहत होती. त्यावेळेस विशाखाची आई किचनमधून बाहेर आली. नंतर विशाखाला अभ्यास करण्यास सांगितले. नंतर विशाखाची आई किचनमध्ये गेली. त्यावेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. विशाखाला आईच्या बोलण्याचा राग आला. राग मनात धरून विशाखा तिसऱ्या मजल्यावर गेली. आणि घरातील तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर तिनं गळफास लावून आत्महत्या केली.


विशाखाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. तिनं तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. तसेच विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केले. सदर घटनेची पोलिस तपासणी करत असून, विशाखाने आत्महत्या करण्याचे नेमके हेच कारण आहे का? किंवा इतर काही गोष्टी त्यास कारणीभूत आहे? याविषयी पोलिस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीसाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या 26 जादा फेऱ्या; 21 नोव्हेंबरपर्यंत विशेष सेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

धक्कादायक! ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या हवामानाचा महा-यू टर्न; हवामान खात्याचा मोठा इशारा!

महाराष्ट्रात सध्या नोव्हेंबर महिन्याचे दिवस सुरू असून, हवामानात सतत होणारे बदल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

Buldhana rabies death : बुलढाण्यात मन हेलावून टाकणारी घटना : पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यानंतर १२ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराबाहेर

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'पुणे मेट्रो'ने

Nagpur Metro: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, दिवाळी सणानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळेत बदल

नागपूर: दिवाळी सणानिमित्त नागपूर शहरातील मेट्रो सेवा काही ठराविक वेळेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय 'नागपूर