राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सहकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी माहिती देईपर्यंत अनेकांना राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्याची माहिती नव्हते. बिरेंद्र सराफ यांच्याकडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी होती.

पुढील व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत बिरेंद्र सराफ यांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महाअधिवक्ता पदाची जबाबदारी हाताळण्याची तयारी दाखवली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिरेंद्र सराफ यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी आणि वादग्रस्त प्रकरणं यशस्वीपणे हाताळली आहेत. लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणात सराफ यांनी कंगनाची बाजू उच्च न्यायालयात मांडली होती. यानंतर उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूनं निकाल देत महापालिकेला कंगनाला दोन कोटी रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते.

डॉ. बीरेंद्र सराफ हे देशातील एक प्रमुख कायदेशीर सल्लागार आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. ते २०२२ पासून राज्याचे महाधिवक्ता आहेत. त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात झाली होती. तेव्हापासून ते राज्याचे महाधिवक्ता आहेत.
Comments
Add Comment

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20

Indian Railway Special Trains : रेल्वेचा मोठा दिलासा! सणासुदीच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात १८,००० विशेष गाड्या सुरू; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : दिवाळी, दुर्गा पूजा आणि छठ पूजा यांसारख्या प्रमुख सणांच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी

Mumbai Crime : लोकल ट्रेनमध्ये राडा! दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद; एकजण रेल्वेतून पडला खाली

गुरुवारी (६ नोव्हेंबर) रात्री सुमारे साडेदहा वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनमध्ये दोन

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन