Mumbai Crime : लोकल ट्रेनमध्ये राडा! दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद; एकजण रेल्वेतून पडला खाली

गुरुवारी (६ नोव्हेंबर) रात्री सुमारे साडेदहा वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेदरम्यान, एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली पडला. परंतु ट्रेन मुंबई सेंट्रल स्टेशनवरून कमी वेगाने जात असल्याने सुदैवाने तो बचावला. मिळालेल्या वृत्तानुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेनच्या दारात उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. धावत्या लोकल ट्रेनमध्ये त्या दोन प्रवाशांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या झटापटीदरम्यान, एक प्रवासी धावत्या डब्यातून खाली पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


आधी देखील घडल्या होत्या अशा घटना


मुंबईत मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून झालेल्या वादाला जून महिन्याच्या सुरुवातीला एका लोकल ट्रेनमध्ये जीवघेणे वळण लागले, ज्यात एका २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मयंक लोहार नावाचा तरुण चर्चगेट नालासोपारा जलद लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होता. मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा बंद ठेवावा की उघड ठेवावा यावरून त्याच दुसऱ्या एका प्रवाशासोबत जोरदार शाब्दिक वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन तरुणाला त्यात आपला जीव गमवावा लागला.



तसेच चर्चगेट नालासोपारा लोकल ट्रेनमधील एका २२ वर्षीय प्रवाशाच्या प्राणघातक हत्येनंतर काही दिवसांनी मुंबईत चाकू हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अपघाताने झालेल्या धक्क्यातून सुरु झालेल्या किरकोळ वादानंतर माहीम रेल्वे स्टेशनजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीची ओळख नवीन प्रसन्ना अशी असून तो माहीममधील पितांबर लेनवरील कुरेशी महल कंपाउंडचा रहिवासो आहे आणि लोअर परेलमधील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो.

Comments
Add Comment

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन

BMC : महापालिकेत बदल्यांचा बंपर धमाका, तब्बल 695 कनिष्ठ आणि दुय्यम तसेच सहायक अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई (विशेष प्रतनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक

कुलाब्यातील पंचशील नगरमधील सफाई कामगारांची दिवाळी गोड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता

Mumbai : येत्या मेपासून धारावी मलजल प्रक्रिया केंद्रातून वापरता येईल 209 एमएलडी पाणी, आतापर्यंत प्रकल्पाची 76 टक्के काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर