ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेवर थेट निशाणा साधला, तर शिवसेनेने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस यांचा 'ठाकरे ब्रँड'वर हल्ला


बेस्ट निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करताना 'ठाकरे ब्रँड'चा पराभव झाल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचा खरा 'ब्रँड' होते आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा दुय्यम 'ब्रँड' आहे, जो आता संपुष्टात आला आहे. त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला.

संजय राऊत यांचे 'ब्रँडी'तून प्रत्युत्तर


फडणवीस यांच्या टीकेला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तात्काळ आणि बोचरे प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याला 'ब्रँडी' पिलेल्या व्यक्तीचे वक्तव्य संबोधले. या शाब्दिक हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या वादामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. 'ब्रँड' आणि 'ब्रँडी'च्या या युद्धात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन

BMC : महापालिकेत बदल्यांचा बंपर धमाका, तब्बल 695 कनिष्ठ आणि दुय्यम तसेच सहायक अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई (विशेष प्रतनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक

कुलाब्यातील पंचशील नगरमधील सफाई कामगारांची दिवाळी गोड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता

Mumbai : येत्या मेपासून धारावी मलजल प्रक्रिया केंद्रातून वापरता येईल 209 एमएलडी पाणी, आतापर्यंत प्रकल्पाची 76 टक्के काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर