कुलाब्यातील पंचशील नगरमधील सफाई कामगारांची दिवाळी गोड

कामगारांना घरांच्या चाव्यांचे केले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


पंचशील नगर, कुलाबा येथे आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थान चावी वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर जिल्हा) एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार अॅड. राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, शायना एन. सी आदी उपस्थित होते.



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण या दोन योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता सुरू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याचा मुलगा त्यांच्या जागी लागल्यानंतर हे निवासस्थान त्याला हस्तांतरित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवास स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता मुंबईकरांच्या आरोग्य जपणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगले प्रशस्त घर देण्याची जबाबदारी शासनाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लाडपागे समिती १९७३ मध्ये तयार झाली आणि नंतर काही अडचणींमुळे या समितीचे कामकाज बंद झाले. ही समिती २०१५ मध्ये पुन्हा नव्याने शासन निर्णय काढत सुरू केली आणि वारस पद्धत लागू केली, असेही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शिक्षण अहर्ता प्राप्त करणाऱ्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने न्यायालयीन लढा जिंकत लाडपागे समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटी, रोजंदारी, ऐवजदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन आणि त्यांच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.



स्वच्छता कर्मचारीच मुंबईचे खरे हिरो - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात. कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Mumbai : येत्या मेपासून धारावी मलजल प्रक्रिया केंद्रातून वापरता येईल 209 एमएलडी पाणी, आतापर्यंत प्रकल्पाची 76 टक्के काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर

Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Update: दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही मुंबईमध्ये गुलाबी थंडी पडलेली नाही. मुंबईत शनिवारी

Komal Punjabi : कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांना पदावरून तात्पुरते केले बाजूला...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न

Ghatkopar Fire : घाटकोपर येथील इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग; 3 जण जखमी

घाटकोपर : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कुकरजा पॅलेस या उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. 6

कुलाब्यातील शासकीय कार्यक्रमातून खासदार मिलिंद देवरांना डावलले; आयुक्त अश्विनी भिडेंना खरमरीत पत्र!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत रक्तरंजित घटना, दोन बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार; गोळी एकीच्या कानाला तर दुसरीच्या...

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये दोन तरूणींवर