पुनावाला फिनकॉर्पचे शेअर आज तुफान उसळले १५% वाढत इंट्राडे अप्पर सर्किटवर 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आज पुनावाला फिनकॉर्प (Poonawala Finance Limited) कंपनीचा शेअर १५% पर्यंत उसळला होता. दुपारी ३.०७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १२.१०% उसळत ५०१.२० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. सकाळी सत्राच्या सुरुवातीला शेअर १५% उसळल्याने आज कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकावर (All time High) वर पोहोचल्याने अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. खासकरून कंपनीच्या संचालक मंडळाने ३.३ कोटींचे प्रेफरन्सशियल शेअर (Preferential Shares) प्रवर्तक (Promoter) असलेल्या Rising Sun Holdings Limited कंपनीला वाटप (Allotment) करण्याचे ठरवल्यानंतर आज शेअर अप्पर सर्किटवर गेला.आज कंपनीने आपल्या ३३१४८१०२ पूर्णतः भरलेल्या (Fully Paid up) इक्विटी शेअर्सचे वाटप मंजूर केले आ हे ज्यांचे दर्शनी मूल्य २ रुपये प्रति शेअर आहे ज्याची किंमत ४५२.५१ प्रति इक्विटी शेअर आहे असे कंपनीने बुधवारी एका नियामक फाइलिंगमध्ये म्हटले होते.'


या वाटपानंतर कंपनीचे जारी करून सबस्क्राइब केलेले आणि पेड-अप इक्विटी शेअर भांडवल १५५.८४ कोटी (प्रत्येकी २ रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेले ७७.९२ कोटी इक्विटी शेअर्सवरून आता मूल्यांकन १६२.४७ कोटी प्रति २ रूपये दर्शनी मूल्या चे ८१.२३ कोटी इक्विटी शेअर्सपर्यंत वाढले आहे. पूनावाला फिनकॉर्पच्या संचालक मंडळाने (Board of Directors )१० सप्टेंबर रोजी १ लाख सुरक्षित, रिडीमेबल, रेटेड, लिस्टेड, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) च्या वाटपाला मान्यता दिली होती ज्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १ लाख होते. या सिक्युरिटीजची एकूण रक्कम १००० कोटी इतकी आहे. कंपनीने हे डिबेंचर्स खाजगी प्लेसमेंट (Private Placement) आधारावर वाटप केले आहेत.हे डिबेंचर (Debentures) ८ सप्टेंबर २०२८ रोजी परिपक्व (Matured) होईल आ णि त्यावर वार्षिक ७.५८% कूपन व्याजदर आहे असे कंपनीने म्हटले आहे.


बाजारातील वृत्तानुसार, गुरुवारी दैनंदिन सरासरीपेक्षा या शेअरच्या किमतीत २९.७१ पट जास्त वाढ झाली. एका महिन्यात या शेअरच्या किमतीत ७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर सहा महिन्यांच्या कालावधीत तो ६४% पेक्षा जास्त वाढला आहे. वर्षाच्या सुरुवा तीपासून, तो ६०% ने वाढला आहे.पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड ही सायरस पूनावाला समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे जी ग्राहक आणि एमएसएमई वित्तपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण