'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळाव्यात या उद्देशाने म्हाडाने आतापर्यंत नागरिक सुविधा केंद्र (सीएफसी), अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली (व्हीएमएस), आणि डीजी-प्रवेश यांसारख्या महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. या शृंखलेत आणखी एक अभिनव पाऊल यकत, आज 'म्हाडासाथी' या एआय चॅटवॉट सेवेचे लोकार्पण 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले.


म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात 'म्हाडासाथी' एआय चॅटवॉटचे प्रात्यक्षिक देताना जयस्वाल म्हणाले की, डीजीटायझेशनच्या युगात म्हाडाने आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करत नागरिकांसाठी उपयुक्त व तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 'म्हाडासाथी' हा चंटबॉट त्या दिशेने घेतलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते पुढे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात हा चॅटबॉट म्हाडाच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला असून, याद्वारे नागरिकांना विविध विषयांवरील अचूक, विश्वासार्ह व तत्काळ माहिती मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात, ही सेवा लवकरच मोबाईल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जयस्वाल म्हणाले.


'म्हाडासाथी' हा एनेन्टिक चॅटबॉट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती या चेटबॉटमध्ये नागरिकांना सहज मिळणार आहे. या उपक्रमामुळे म्हाडाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती संगणकीय सोडत प्रणाली विषयीची माहिती, नागरिकांनी म्हाडा कार्यालयामध्ये केलेल्या अर्जाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती, म्हाडातर्फे प्रसिद्ध होणारी निविदा सुचनांबाबतची माहिती, म्हाडाच्या राज्यातील विविध गृहप्रकल्पांची माहिती, म्हाडाचे नवीन नियम, नियमावली यांबाबतची अद्ययावत माहिती नागरिकांना या माध्यमातून मिळणार आहे.


या कार्यक्रमास मुंबई इमारत सुधार व पुनर्विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर (भा.प्र.से.), मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर (भा. प्र.से.), म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पदरकरी, महेशकुमार जेसवाणी, ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्यासह अन्य अधिकारी आणि कमर्चारी वर्ग उपस्थित होते.



नागरिकांना घरातूनच डॉक्यूमेंट पाठवता येणार


म्हाडातर्फे नागरिक सुविधा केंद्राला भेट देणाऱ्या नागरिकाचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात आला असून तो कमी होऊन आता ७ ते ८ मिनिटांवर आणला आहे. नागरिकांचे दस्तवेज अथवा टपाल स्कॅनिगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक आपली कागद‌पत्रे स्कॅन करून यापुढे या केंद्रावर सादर करू शकतील, तसेच पुढच्या टप्प्यात या सुविधा केंद्रावर येऊन कागदपत्रे सादर करण्यापेक्षा नागरिकांना घरी बसूनच कागदपत्रे पाठवता येतील यादृष्टीने ही प्रणाली अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देखील जयस्वाल यांनी दिली. तसेच म्हाडाने आपल्या वेबसाईटवर सुमारे १५ कोटी कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यामुळे म्हाडामध्ये माहिती अधिकारांतर्गत येणारे अर्ज तुलनात्मकरित्या कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.


Comments
Add Comment

AI in MCA Coaching: मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती! MCA च्या प्रशिक्षणात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन

BMC : महापालिकेत बदल्यांचा बंपर धमाका, तब्बल 695 कनिष्ठ आणि दुय्यम तसेच सहायक अभियंत्यांच्या बदल्या

मुंबई (विशेष प्रतनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक

कुलाब्यातील पंचशील नगरमधील सफाई कामगारांची दिवाळी गोड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता

Mumbai : येत्या मेपासून धारावी मलजल प्रक्रिया केंद्रातून वापरता येईल 209 एमएलडी पाणी, आतापर्यंत प्रकल्पाची 76 टक्के काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर