मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम देशभर राबवताना दिसून येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आज अनेक राज्यात "नमो युवा रन" आयोजित करण्यात आली. मुंबईत देखील याचे दिमाखात आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवत आपला उत्स्फूर्त सहभाग देखील दर्शवला.


मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड प्रोमेनेड येथे 'नमो युवा रन' चे आज सकाळी आयोजन करण्यात आले.  प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण, ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांसोबतच, भाजप खासदार आणि भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याकरणामुळे मुंबईकरांनी मोठ्या संख्येत या रनमध्ये सहभाग घेतला होता.





भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) द्वारे आयोजित "नमो युवा रन" रविवारी केवळ मुंबईत नव्हे तर जयपूर, कुरुक्षेत्र, रायपूर आणि आगरतळा येथे देखील पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रनला विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवत दिमाखात सुरुवात केली.



"फिट इंडिया" मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी "नमो युवा रन" चे आयोजन


भारतीय जनता युवा मोर्चा (भाजप) म्हणते की "नमो युवा रन" चा उद्देश तरुणांमध्ये फिटनेस, एकता आणि देशभक्ती वाढवणे आहे. देशाच्या विकासाला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील "फिट इंडिया" मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन