जागतिक गोंधळात सुखावणारी बातमी : ५० टक्क्यांहून अधिक भारतीय देशी ब्रँड खरेदीला प्राधान्य देतात 'या' आकडेवारीत स्पष्ट

रुकाम कॅपिटलच्या ‘नवीन भारताच्या आकांक्षा’ अहवालात उघडकीस


पहिल्या श्रेणीतील शहरांत आर्थिक प्रौढत्व दिसून येते मोबाईल पेमेंट पद्धती (३६%) आणि क्रेडिटचा वापर (२४%) बक्षिसे व परताव्यामुळे संतुलित आहे. तिसऱ्या श्रेणीतील शहरांत कार्डवर अवलंबित्व खूप कमी (१६%) असून मोबाईल पेमेंटचा वापर सर्वाधिक (४२%) आहे असे अहवालाने आपल्या निष्कर्षात म्हटले.


मिलेनियल्स आणि जनरेशन झेड उत्सव काळात ‘आयुष्यमान जीवन’ला प्राधान्य देत आहेत, सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेले उत्पादन, आरोग्यदायी स्नॅक्स आणि साखरमुक्त मिठाई यांकडे कल वाढतो आहे.


आगामी (Emerging) खरेदी विभागांमध्ये आरोग्य व आयुष्यमान जीवन, स्वयंपाकघरातील उपकरणे, अन्न व पेये, फॅशन वस्तू, आणि पाळीव प्राणी काळजी (Pet Care) यांचा समावेश आहे.


मोहित सोमण:देशी ब्रँड्सविषयी नव्या अभिमानामुळे शहरांतील आणि गावेतील ग्राहकांच्या खरेदी निर्णयावर प्रभाव पडतो आहे. अर्ध्या पेक्षा जास्त प्रतिसाददात्यांनी (Respondent) असे सांगितले की त्यांना देशी किंवा लहान व्यवसायांचे उत्पादन खरेदी करा यला आवडते. त्यांनी सहज उपलब्धता, संबंधित कथा (Related Stories) आणि खरी मूल्ये हे मुख्य कारण म्हणून सांगितले असे रुकाम कॅपिटलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. रूकाम कॅपिटल (Rukam Capital) ही प्रारंभीच्या टप्प्यातील (Early St age) ग्राहक ब्रँड्समध्ये गुंतवणूक करणारी वेंचर कॅपिटल कंपनी आहे. या बदलत्या ग्राहक वर्तणुकीचे (Changing Consumer Behaviour Pattern) पसंतीचे आणि खरेदी निर्णयाचे विश्लेषण करणारा अहवाल सादर करत आहे.अहवालातील माहितीनुसार, भारतीय ग्राहक अर्थव्यवस्था २०३० पर्यंत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची तयारी करत आहे. रुकाम कॅपिटलचा अहवाल नवीन भारताच्या आकांक्षा: ग्राहक कसे निवडतात, खरेदी करतात आणि ब्रँडशी जोडतात यावर तसेच भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मानसि कतेनुसार ब्रँड्स, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा दृष्टीने मार्गदर्शन करतो. हा अहवाल युवा, महत्त्वाकांक्षी आणि जागतिक दृष्टीकोन असलेल्या भारताच्या आत्म्याचे दर्शन घडवतो, तरीही टिकाऊपणा (Sustainbility) प्रामाणिकपणा आणि समाजा बद्दल जागरूकता याकडे लक्ष दिलेले असल्याचे रूकामने म्हटले. अहवालानुसार, ग्राहक उच्च दर्जाचे आणि सामाजिक कारणांसाठी काम करणारे देशी ब्रँड वापरण्यास तयार आहेत, ज्यामुळे समुदाय विकासाला चालना मिळते.


रुकाम कॅपिटलच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार अर्चना जहागीरदार म्हणाल्या आहेत की,'भारतीय ग्राहक आता फक्त ट्रेंड पाहणारे निष्क्रिय सहभागी नाहीत; बाजारपेठ बदलत आहे आणि हे बदल परवडणारी किंमत, महत्त्वाकांक्षा आणि डिजिटल प्रौढत्वावर आधारित आहेत. भारत सांगतो आहे की फक्त ब्रँड काय विकतोय ते महत्त्वाचे नाही, तर ते ग्राहकांना कसे जोडते, समजते आणि मूल्य देत आहे हे महत्त्वाचे आहे. या बदलामुळे पारंपरिक श्रेण्या फक्त हंगामी ट्रिगर्सपुरत्या मर्यादित राहणार नाहीत; त्या आरोग्यदायी पर्याय, पारदर्शक संवाद किंवा समुदायाभिमुख सहभागाद्वारे स्वतःला पुनर्रचना करत आहेत. फाउंडर्ससाठी, भारतात निष्ठा निर्माण करणे आता फक्त सवलतींवर अवलंबून नाही; ते दररोजच्या खरेदीत अर्थ निर्माण करण्याबाबत आहे.'


अहवालातील निष्कर्ष:


देशी ते आवडते – (From Local to Loved) भारतीय ग्राहकांच्या हृदयात 'घरटे' बांधणारे ब्रँड्स


५८% प्रतिसाददात्यांनी सांगितले की त्यांना मुख्यतः देशी किंवा लहान व्यवसायांचे उत्पादन खरेदी करायला आवडते.


७६% प्रतिसाददात्यांनी देशी ब्रँड्सच्या प्रामाणिक संवादास आणि दररोजच्या समस्यांसाठी नवोपक्रम समाधानास प्रशंसा दिली.


३०% म्हणाले की स्टार्टअप्स समुदाय तयार करतात आणि ‘सदस्यत्वाची भावना’ वाढवतात; ४०% ग्राहकांचा असा विश्वास आहे की स्टार्टअप्स ग्राहक-केंद्रित असल्यामुळे आकर्षक ठरतात.


टिकाऊपणा निर्णय प्रक्रियेला आकार देतो, ७६% पर्यावरणपूरक ब्रँड निवडतात.


डिजिटल, गतिशील आणि स्थानिक भाषा माध्यमे:


मोबाइल-प्रथम प्रवेश, स्थानिक भाषेतील सामग्री, आणि वाढती इंटरनेट स्वीकार्यता ग्राहकांच्या मीडिया सवयींवर प्रभाव टाकत आहेत.


७३% लोक सोशल मीडियावर ब्रँडशी संवाद साधतात, तर ६७% लोकांना असे ब्रँड्स आवडतात जे जलद प्रतिसाद देतात.


टियर १ शहरांत मोबाईल पेमेंट (३६%) आणि क्रेडिट कार्ड (२४%) संतुलित आहेत; टियर ३ मध्ये कार्ड अवलंबित्व कमी (१६%) असून मोबाईल पेमेंट वापर सर्वाधिक (४२%) आहे.


सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्ती – ब्रँड शोध व खरेदीवर प्रभाव


पाळीव प्राणी काळजी श्रेणीवर ५०% ग्राहक सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या प्रभावात येतात.


स्वयंपाकघरातील उपकरणांमध्ये ४३% ग्राहक प्रभावी व्यक्तींच्या शिफारसीवर विश्वास ठेवतात.


फॅशनमध्ये, फक्त ३ पैकी १ ग्राहक सेलिब्रिटी प्रभावामुळे खरेदी करतो.


खरेदीची प्रेरणा व अडथळे:


सवलती खरेदीसाठी मुख्य प्रेरक ठरत आहेत; ४८% ग्राहक ई-कॉमर्स साइट्स तपासतात आणि ४७% सवलतीसाठी वाट पाहतात.


३२% ग्राहकांसाठी उत्कृष्ट ग्राहक सेवा ब्रँड निवडीसाठी महत्त्वाची आहे, तर २९% ने उत्पादन गुणवत्तेतील बदल प्रमुख अडथळा मानला.


उत्तर भारतातील ३५% प्रतिसाददात्यांनी फक्त महिला नेतृत्व असलेल्या व्यवसायांमधून खरेदी करतात; यापैकी ७२% मिलेनियल्स आणि जनरेशन झेडचे सदस्य हेच प्राधान्य देतात.


टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये कारणाभिमुख खरेदी टियर १ प्रमाणे नाही.


सण-उत्सवात वारसा आणि आरोग्य:


उत्सव काळात, ३५% ग्राहक सांस्कृतिक मूल्य असलेले उत्पादन खरेदी करतात.


भारतात वेलनेस आणि आरोग्य प्रथम पर्यायाची वाढती आवड दिसून येते. हेल्दी स्नॅक्स खरेदी यादीत आघाडीवर आहेत – ५३% मिलेनियल्स आणि ४७% जनरेशन झेड ग्राहक या सत्रात खरेदी करण्याचा विचार करत आहेत.


मिठाईतही बदल दिसतो – ७३% तरुण ग्राहक आता साखरमुक्त विकल्प पसंत करतात.


उत्सव खरेदीत, टियर १ शहरांत ६१% ग्राहक देशी ब्रँडला प्राधान्य देतात आणि ५९% कारणाभिमुख खरेदी करतात, सांस्कृतिक जागरूकता दर्शवते.


विभाग व खरेदी मार्ग:


ऑफलाइन-प्रधान श्रेण्या: फॅशन वस्तू (६०%), अन्न व पेये (३९%) – डेमो, मोफत नमुने, नियमित खरेदीवर आधारित.


ऑनलाइन-प्रधान श्रेण्या: पाळीव प्राणी काळजी (६३%), घरगुती उपकरणे (५८%), आरोग्य व आयुष्यमान जीवन

Comments
Add Comment

BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन

Vaijapur Crime News : 'मार मार मारलं, पाणी मागितलं अन् तोंडात...'; वैजापूर हत्या प्रकरणाने खळबळ; पालकमंत्र्यांची पीडित कुटुंबीयांना भेट

वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक माणुसकीला कलंक फासणारी घटना समोर आली आहे.

वनडेतील नशीबवान फलंदाज! आकडेवारी पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, गेल्या 3 वर्षांत कुणालाही जमलं नाही

क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जीवदान मिळालं की त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असतो. पण अशी संधी अनेकदा

Nashik : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नाशिकच्या MIDC परिसरात पोलिसांचा कडक पहारा ! सातपूर-अंबडमध्ये रात्रीची गस्त वाढणार

नाशिक : दिवाळीच्या सणानिमित्त 8 ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कारखाने सलग काही

Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Update: दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही मुंबईमध्ये गुलाबी थंडी पडलेली नाही. मुंबईत शनिवारी