डॅरेल मिचेलला अशी मिळाली संधी
डॅरेल मिचेलने 104 चेंडूंचा सामने केला आणि 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. त्याने 52.88 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. खरं तर या खेळपट्टीवर तग धरणं कठीण होतं. त्याच्या या झुंजार खेळीमुळे थोडा का होईना न्यूझीलंडचा डाव सावरला. न्यूझीलंडने 41 षटकात सर्व गडी गमवून 134 धावा केल्या. तसेच विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं आहे. यात 55 धावा या एकट्या डॅरेल मिचेलच्या आहेत. त्यामुळे उर्वरित संघ 79 धावा करू शकला. यात मिचेल सँटनरने 31 धावांची खेळी केली.
🚨 CATCH DROPPED BY SHUBMAN GILL! 😬
A missed opportunity for India in Wellington. 🇮🇳
#ShubmanGill https://t.co/qrnRdZO4y8
— Vikram Panchal 🇮🇳 (@vikrampanchal68) November 7, 2026
Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 6 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री उशिरा सोशल ...
डॅरेल मिचेल असा ठरला नशिबवान
जानेवारी 2023 पासून आतापर्यंत डॅरेल मिचेलला नशिबाची जोरदार साथ मिळाली आहे. कारण त्याचा झेल सोडण्याची ही पहिली दुसरी नाही तर 18वी वेळ आहे. या कालावधीत डॅरेल मिचेल इतकं जीवदान कोणत्याच फलंदाजाला मिळालेलं नाही, हे विशेष.. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत जेव्हा कधी डॅरेल मिचेलचा झेल गेला तेव्हा टक्केवारीचा हिशेब काढला तर 64 टक्के झेल बाद झाला. म्हणजेच उर्वरित 36 टक्क्यात त्याला जीवदान मिळालं आहे.