'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर प्रदर्शित: रिषब शेट्टीसोबत झळकणार ही अभिनेत्री !

मुंबई : 'कांतारा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. केवळ कन्नड भाषेतच नव्हे, तर हिंदी, तेलुगू आणि तमिळमध्येही या चित्रपटाने मोठे यश मिळवले. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी रिषब शेट्टीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. याच यशानंतर निर्मात्यांनी याचा पुढील भाग तयार करण्याचा निर्णय घेतला असून 'कांतारा: चॅप्टर १' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे.


या चित्रपटात रिषब शेट्टीसोबत अभिनेत्री रुक्मिणी वसंत झळकणार आहे. ती 'कनकावती' ही भूमिका साकारत आहे. रुक्मिणीने २०१९ मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून कमी वेळातच तिचा अभिनय गाजू लागला आहे. ती आता यशच्या 'टॉक्सिक' आणि प्रशांत नील व ज्युनियर एनटीआर यांच्या 'ड्रॅगन'मध्येही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


'कांतारा चॅप्टर १' हा मूळ 'कांतारा'चा प्रीक्वेल आहे. या भागात 'भूत कोला' परंपरेचा उगम, जंगलातील गूढ, आदिवासी जीवन आणि एका राजाचे शोषण याभोवती कथा फिरते. चित्रपटाचे संगीत बी. अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे.


'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५, म्हणजेच दसरा आणि गांधी जयंतीच्या दिवशी, प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, 'कांतारा'चा पहिला भाग अवघ्या १६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने जगभरात तब्बल ४५० कोटींहून अधिक कमाई केली होती.


आता या प्रीक्वेलकडूनही तितकीच अपेक्षा ठेवली जात आहे, आणि ट्रेलर पाहता, प्रेक्षक पुन्हा एकदा जंगलाच्या त्या गूढ जगात हरवून जाणार, यात शंका नाही.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’